Take a fresh look at your lifestyle.

शिक्षक पतसंस्थेच्या निवडणुकीत ३० उमेदवार रिंगणात

१ जानेवारीला पार पडणार निवडणूक प्रक्रिया

0

संग्रामपूर:- लांबणीवर पडलेल्या संग्रामपूर तालूका प्राथमिक शिक्षक सहकारी पतसंस्थेची निवडणूक नविन वर्षात पार पडणार आहे. १ जानेवारी २०२३ ला सकाळी ८ वाजता पासून मतदानाला सुरुवात होणार असून मतदानाची प्रक्रिया पार पडल्यावर एका तासाने मतमोजणी नंतर निकाल जाहीर करण्यात येणार आहे. सदर निवडणूक संग्रामपूर तालुक्यातील वरवट बकाल येथील पतसंस्थेच्या कार्यालयात धेण्यात येणार असून १८२ मतदार आपल्या मतदानाचा हक्क बजावणार आहेत. या निवडणुकीत १५ जागेसाठी ३० उमेदवार रिंगणात आहेत.

या पतसंस्थेवर झेंडा फडकवण्यासाठी परिवर्तन व प्रगती असे दोन पॅनल समोरासमोर उभे ठाकले आहे. दोन्हीही पॅनल कडून संग्रामपूर तालुक्यात प्रचाराचा धुरडा उडत असून हेवेदावे सुरू झाले आहे. प्रहार संघटना व शिक्षक सेना यांनी परिवर्तन पॅनलला पाठिंबा जाहीर केल्याने हि निवडणूक एकतर्फी होण्याची दाट शक्यता आहे. वाढता पाठिंबा पाहता परिवर्तन पॅनलचा विजय निश्चित मानला जात आहे. एकतर्फी निवडणूक होणार असल्याचे चित्र असले तरी १ जानेवारीला मतदारांचा कौल कोणाकडे हे स्पष्ट होणार आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.