Take a fresh look at your lifestyle.

शेतकऱ्यांना मिळणार 30 हजार आर्थिक मदत

0

ज्या शेतकऱ्यांचे दुधाळ किंवा अन्य जनावरे लम्पी आजारामुळे दगवली आहे आशा शेतकऱ्यांना मिळणार 30 हजार आर्थिक मदत या संदर्भात संपूर्ण माहिती या ठिकाणी जाणून घेऊया.

शासनाच्या वतीने शेतकऱ्यांच्या पशूधनाची हानी झाली असेल तर त्यांना 30 ते 16 हजारापर्यंत आर्थिक मदत दिली जाणार आहे त्या संबंधित जी. आर देखील काढण्यात आला आहे.
शेतकऱ्यांना दिली जाणारी ही मदत राष्ट्रीय आपत्ति निवारण धोरणामधील निकषानुसार दिली जाणार आहे.

केंद्राने प्राण्यामधील संक्रमण व सांसर्गिक रोगास प्रतिबंध व नियंत्रण अधिनियम 2009 यानुसार जनावरांना होणार लम्पी चर्म रोग अनुसूचित करण्यात आला आहे.

सध्या महाराष्ट्र राज्यातील एकूण 21 जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या जनावरांना हा रोग झालेला आहे.

सगळ्यात अगोदर हा लम्पी चर्मरोग दिनांक 4 ऑगस्ट 2022 रोजी महाराष्ट्र राज्यातील जळगाव जिल्ह्यामध्ये आढळून आला होता.

त्यानंतर महाराष्ट्रतील 21 जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या पशुधनास या रोगाची लागण झाली.

त्यामुळे ज्या शेतकऱ्यांच्या पशुधनास लम्पी हा रोग झालेला आहे अशा शेतकऱ्यांना आता शासनाकडून अनुदान दिले जाणार आहे.

शेतकऱ्यांना मिळणार 30 हजार आर्थिक मदत खालीलप्रमाणे

शेतकऱ्यांना मिळणारी 30 हजार आर्थिक मदत खालील प्रमाणे मिळणार आहे.

 • ज्या शेतकऱ्यांकडे दुधाळ जनावरे असतील आणि ही जनावरे या रोगाने प्रभावित झाली असतील तर
 • अशा पशुपालकांना 30 हजार रुपये प्रती जनावर या प्रमाणे 90 हजार आर्थिक मदत दिली जाणार आहे.
 • शेतकऱ्यांकडील केवळ तीनच जनावरांना याचा लाभ मिळणार आहे.
 • शेतकऱ्यांच्या तीन बाधित बैलांना देखील रुपये 25 हजार प्रति बैल या प्रमाणे आर्थिक मदत दिली जाणार आहे.
 • शेतकऱ्यांकडे वासरे म्हणजेच लहान जनावरे असतील आणि त्यांना देखील हा रोग झाला असेल तर अशा वासरांना 6 हजार प्रती जनावर याप्रमाणे आर्थिक साहाय्य दिले जाणार आहेत

  पंचनामा केल्यावरच शेतकऱ्यांना मिळणार 30 हजार रुपये आर्थिक मदत

  कोणत्या शेतकऱ्यांच्या कोणत्या जनावरास किती मदत मिळणार आहे हे तर आपण जाणून घेतले आहे. परंतु ही मदत मिळविण्यासाठी काही निकष देण्यात आलेले आहेत ते खालीलप्रमाणे.

  • शेतकऱ्यांचे जनावरे आजाराने दगावली तर ज्या दिवशी ही जनावरे दगावली त्या दिवशी किंवा
  • जनावरे दगाविल्यापासून जास्तीत जास्त दुसऱ्या दिवशी जवळच्या दवाखान्यात सूचना द्यावी तसेच ग्रामपंचायतला देखील सूचित करावे.
  • जनावरांचा मृत्यू लम्पी रोगाने झाला असेल तरच ही मदत दिली जाणार आहे.

  तर अशा पद्धतीने शेतकऱ्यांना लम्पी आजाराने जनावरे दगावले तर आर्थिक मदत

Leave A Reply

Your email address will not be published.