Take a fresh look at your lifestyle.

६३ हजार संपकरी एसटी कर्मचाऱ्यांना वेतन नाहीच.. ; सर्वजण निलंबित, बडतर्फ, सेवासमाप्ती झालेले

दोन महिन्यांपेक्षा जास्त कालावधी उलटूनही विलीनीकरणाच्या मागणीसाठी एसटीचे कर्मचारी संपावर ठाम आहेत.

0

मुंबई : संपावर ठाम राहिलेले आणि गैरहजर एसटी कर्मचाऱ्यांना दुसऱ्यांदा वेतनाला  मुकावे लागणार आहे. आज, शुक्रवारी ७ जानेवारीला एसटी कर्मचाऱ्यांच्या खात्यावर नवे वेतन जमा होईल. मात्र उपस्थित एसटी कर्मचाऱ्यांनाच वेतन मिळणार असून संपात सामील असलेल्या कर्मचाऱ्यांना सलग दुसऱ्यांदा वेतन मिळणार नाही. एकूण ८८ हजार ३४७ कर्मचाऱ्यांपैकी निलंबित, बडतर्फ, सेवासमाप्ती केलेले कर्मचारी आणि संपात सध्या सामील असलेल्या ६३ हजार ७०७ कर्मचाऱ्यांना नव्या वेतनावर पाणी सोडावे लागणार आहे.

दोन महिन्यांपेक्षा जास्त कालावधी उलटूनही विलीनीकरणाच्या मागणीसाठी एसटीचे कर्मचारी संपावर ठाम आहेत. निलंबन, सेवासमाप्ती, बडतर्फीची कारवाई केल्यानंतरही या कारवाया मागे घेण्याचे आश्वासन दिले. त्यापूर्वी ७ डिसेंबरपासून कर्मचाऱ्यांना नवीन वेतनवाढही लागू केली. परंतु सातव्या वेतन आयोगाप्रमाणे वेतनवाढ देण्याची मागणी करून कर्मचारी संपावर ठाम राहिले. त्यामुळे अनेक कर्मचारी वेतनाला मुकले. कर्मचाऱ्यांचे वेतन हे दर महिन्याच्या ७ तारखेला होते. दुसरे वेतन खात्यावर जमा होण्याची वेळ आली, तरीही मोठय़ा प्रमाणात एसटी कर्मचारी अद्यापही संपावर आहेत. दोन महिन्यांत काही कर्मचारी निवृत्त झाल्याने सध्या एसटीतील एकूण कर्मचारी संख्या ८८ हजार ३४७ झाली आहे. यात २४ हजार ६४० कर्मचारी कर्तव्यावरच हजर झाले आहेत. तर ६३ हजार ७०७ कर्मचारी कामावर हजर न झाल्याने त्यांना वेतन देण्यात आलेले नाही. निलंबित कर्मचारी ११ हजार २४ असून बडतर्फ केलेल्या कर्मचाऱ्यांची संख्या १ हजार ५१३ आहे, तर बडतर्फीची कारणे दाखवा नोटीस बजावलेले कर्मचारीही ३,५९३ आहेत. याशिवाय रोजंदारीवरील सेवासमाप्ती केलेल्या कर्मचाऱ्यांचीही संख्या सुमारे दोन हजार आहे.

 

 


[cardoza_facebook_like_box]

वार्ताहर नेमणे आहेत

मराठी बातम्या मिळवा आता टेलीग्रामवर.. आमचं चॅनेल (@Batmyaa) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Leave A Reply

Your email address will not be published.