Take a fresh look at your lifestyle.

निरोप समारंभ म्हणजे उत्कृष्ट कार्याची पावती; शिक्षण विस्तार अधिकारी एन.जे.फाळके यांचे प्रतिपादन

0

शेगाव :
पंचायत समिती अंतर्गत असलेल्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळा बेलुरा येथे शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष माणिकराव तांगडे यांच्या अध्यक्षतेखाली शिक्षण परिषद संपन्न झाली,या शिक्षण परिषदेला प्रमुख अतिथी म्हणून गटशिक्षणाधिकारी एस.डी.वायदंडे,शिक्षण विस्तार अधिकारी एन.जे.फाळके व केंद्र प्रमुख विनोद ठाकरे हे लाभले होते.
निरोप समारंभ कार्यक्रमामध्ये कठोरा केंद्रातील स्थानांतर झालेले शिक्षक प्रमोद इंगळे,सुरेश अंबलकर,अर्जुन गिरी,पुरूषोत्तम सपकाळ,मनोहर उंबरकार,अनिल खेडकर, संजय लंके,गोवर्धन गवई,रेखा पवार,गणपत राठोड,अनिल केसकर या शिक्षकांचा निरोप समारंभ आयोजित करण्यात आला होता,याप्रसंगी उपस्थित असलेल्या सर्व शिक्षकांचा दुपट्टा,वाचनीय पुस्तक व पुष्पगुच्छ देऊन व जिल्हा परिषद शाळेमध्ये शिक्षण घेतलेल्या क्षमा भांबेरे यांची पोलीस निरीक्षक (पी.एस.आय.) पदावर निवड झाल्याबद्दल मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला, तसेच शिक्षण विस्तार अधिकारी एन.जे.फाळके यांचे स्थानांतर पंचायत समिती मलकापूर येथे झाल्यामुळे सर्व मुख्याध्यापक यांनी हिंदवी स्वराज्याचे प्रणेते छत्रपती शिवाजी महाराज यांची प्रतिमा,दुपट्टा, पुष्पगुच्छ व वाचनीय पुस्तक भेटवस्तू देऊन सन्मान केला.
कठोरा केंद्रातील स्थानांतर झालेल्या शिक्षकांनी शिष्यवृत्ती परीक्षा व स्पर्धा परीक्षेमध्ये उत्कृष्ट कार्य केले आहे,निरोप समारंभ म्हणजे उत्कृष्ट कार्याची ही पावतीच आहे असे प्रतिपादन शिक्षण विस्तार अधिकारी एन.जे.फाळके यांनी मनोगत व्यक्त करतांना केले,याप्रसंगी गटशिक्षणाधिकारी एस.डी.वायदंडे यांनी विविध शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये जास्तीत जास्त विद्यार्थी पात्र ठरण्यासाठी प्रयत्नशील राहावे असे शिक्षकांना आवाहन केले.
याप्रसंगी निरोप समारंभाचे औचित्य साधून उच्चश्रेणी मुख्याध्यापक सुनिल घावट,अंनतराव वानखडे,विष्णू घोगले यांनी मनोगत व्यक्त केले तर स्वागतगीत गायन अन्नपुर्णा अंभोरे यांनी केले,कार्यक्रमाचे प्रास्ताविक विनोद ठाकरे,संचलन अनिल खेडकर व आभारप्रदर्शन राजेश बावणे यांनी केले.
याप्रसंगी शिक्षक ज्ञानदेव भांबेरे,सुरेश डोसे,संजय महाले,सचिन वडाळ,सुषमा खेडकर,सचिन गावंडे,दिपक चव्हाण,गजानन खोडके,विरोचन जाधव,ज्ञानेश्वर ताठे,दिलीप भोपसे,मीनाक्षी जुनघरे,विद्या डाबेराव,उमा रामटेके,राजु नावकार,राजु पेटकर,गणेश अढावू,जीवन ढोलवाडे,एम.एम.देशमुख, प्रफुल्ल भोंडे,गटसाधन केंद्राचे विषय शिक्षक विक्रम फुसे,साधना मुकवाने,वासुदेव पाटील आदींची उपस्थिती होती.

 

शिक्षण विस्तार अधिकारी यांचा सन्मान करतांना शिक्षक वृंद.
शिक्षण विस्तार अधिकारी यांचा सन्मान करतांना शिक्षक वृंद.

शिक्षण विस्तार अधिकारी यांचा सन्मान करतांना शिक्षक वृंद.

Leave A Reply

Your email address will not be published.