Take a fresh look at your lifestyle.

Aadhaar Card बनवण्याच्या नियमात बदल, केवळ एक स्लिप देऊन पूर्ण होईल काम; UIDAI ने दिली माहिती

Aadhaar Card: लहान मुलांचं आधार कार्ड बनवण्याची प्रक्रिया सोपी करण्यात आली आहे. अवघ्या काही कागदपत्रांची पूर्तता करून तुम्ही तुमच्या बाळासाठी आधार कार्ड मिळवू शकता.

0

नवी दिल्ली : आधार कार्ड (Aadhar Card New Rule) बनवायचं असेल, तर त्या संदर्भात एक महत्त्वाचं अपडेट समोर आलं आहे. UIDAI ने लहान मुलांचं आधार कार्ड बनवण्याच्या नियमात काही बदल करत आहे. त्यामुळे तुम्हाला देखील तुमच्या लहानग्यासाठी आधार कार्ड बनवायचं असेल तर ही बातमी महत्त्वाची आहे. UIDAI ने अशी माहिती दिली आहे की, तुमच्या बाळाच्या जन्माचा दाखल किंवा हॉस्पिटलमधील डिस्चार्जची स्लिप आणि आई-वडिलांपैकी एकाचं आधार कार्ड देऊन बाल आधार (Baal Aadhaar Card New Rule) साठी अर्ज करता येईल. UIDAI ने ट्वीट करत याबाबत माहिती आहे.

UIDAI च्या या निर्णयामुळे नवजात बाळाचं आधार बनवण्यासाठी चिंतेत असणाऱ्या पालकांना दिलासा मिळाला आहे. सुरुवातीला नवजात बाळाचं आधार कार्ड बनवण्यासाठी बर्थ सर्टिफिकेट येईपर्यंत वाट पाहावी लागत असे, आता हे काम हॉस्पिटलची डिस्चार्ज स्लिप देऊनही होईल.

UIDAI ने केलं ट्वीट

UIDAI ने बाल आधार बाबत ट्वीट केलं आहे. या माहितीनुसार, बाळाचं बर्थ सर्टिफिकेट किंवा हॉस्पिटलमधून डिस्चार्ज झाल्याची स्लिप देऊन बाल आधारसाठी अर्ज करू शकता.

बायोमेट्रिकची आवश्यकता नाही

बाल आधार कार्ड पाच वर्षांपेक्षा लहान असणाऱ्या मुलांसाठी जारी केलं जातं. हे कार्ड एक निळ्या रंगाचं कार्ड असतं. नवीन नियमांअंतर्गत पाच वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांसाठी कोणत्याही बायोमेट्रिक तपशीलाची आवश्यकता नसते. तुमच्या मुलाचं वर पाच वर्ष पूर्ण झाल्यानंतर मात्र बायोमेट्रिक डिटेल्स अनिवार्य आहेत. पाच वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांसाठी आधार नोंदणी करताना हाताच्या बोटांचे ठसे किंवा डोळ्याच्या बाहुल्यांचं स्कॅनिंग केलं जात नाही. केवळ फोटोग्राफ वापरून त्यांचं आधार बनवलं जातं.

 

 


[cardoza_facebook_like_box]

वार्ताहर नेमणे आहेत

मराठी बातम्या मिळवा आता टेलीग्रामवर.. आमचं चॅनेल (@Batmyaa) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Leave A Reply

Your email address will not be published.