ऑनलाईन बदल्यापुर्वी अतिरिक्त शिक्षकांचे समायोजन करा
प्रहार शिक्षक संघटनेची शिक्षणाधिकारी यांच्याकडे निवेदनामार्फत मागणी
शेगांव :
जिल्हयातील अनेक शाळेवर पटसंख्या कमी झाल्यामुळे शिक्षकांची पदे रिक्त झालेली आहेत. ऑनलाईन बदली प्रक्रिया होण्यापूर्वी रिक्त पदे असलेल्या शाळेवर अतिरिक्त शिक्षकांचे समुपदेशन पध्दतीने समायोजन करण्यात यावे अशी मागणी प्रहार शिक्षक संघटनेचे जिल्हाध्यक्ष महेंद्र रोठे यांच्या मार्गदर्शनाखाली तालुकाध्यक्ष सुनिल घावट यांनी माध्यमिक विभागाचे उपशिक्षणाधिकारी अनिल अकाळ यांना गटशिक्षणाधिकारी एन.डी.खरात यांच्या प्रमुख उपस्थितीत निवेदनामार्फत केली आहे.
याप्रसंगी माध्यमिक विभागाचे उपशिक्षणाधिकारी यांचा गटसाधन केंद्राच्यावतीने शाल,श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन गटशिक्षणाधिकारी एन.डी.खरात व प्रहार शिक्षक संघटनेच्यावतीने स्वागत करण्यात आले.

जिल्हास्तरावरील चटोपाध्याय वरिष्ठ वेतन श्रेणीची प्रकरणे निकाली काढण्यात यावी, दिव्यांग शिक्षक, मुख्याध्यापक यांची पदोन्नतीबाबतची प्रक्रिया पुर्ण करण्यात यावी,विषय शिक्षकांना वेतनश्रेणी लावण्याबाबतची समस्या निकाली काढण्यात यावी या विषयासंदर्भात चर्चा करण्यात आली.
याप्रसंगी जि.प. शिक्षण शिभागाचे कर्मचारी ईश्वर वाघ,केंद्रप्रमुख सोळंके,विलास चव्हाण,प्रहार शिक्षक संघटनेचे केंद्रसमन्वयक सचिन गावंडे,गटसाधन केंद्राचे रमेश वानखडे,योगेश गणोरकार विनोद वैतकार, श्रीकांत सोनोने,राहूल ससाने,अमोल पिंगळे,साधना मुकवाने,संगीता लोखंडे,जयेश गायकवाड, विक्रम फुसे,शिक्षक अंनतराव वानखडे,रवींद्र माळवे,अमृतराव वानरे,सुभाष खंडेराव आदींची उपस्थितीती होती.