Take a fresh look at your lifestyle.

ऑनलाईन बदली प्रक्रियेपूर्वी शाळेवरील अतिरिक्त झालेल्या शिक्षकांचे समायोजन करा

प्रहार शिक्षक संघटनेचे जिल्हाध्यक्ष महेंद्र रोठे यांची शिक्षणाधिकारी (प्राथमिक) यांच्याकडे निवेदनामार्फत मागणी

0

बुलडाणा :
जिल्हयातील अनेक तालुक्यामध्ये बहुसंख्य शाळेवरील पटसंख्या कमी झाल्यामुळे बरेचसे शिक्षक अतिरिक्त झालेले आहेत,ऑनलाईन बदली प्रक्रिया सुरू होण्यापूर्वी अतिरिक्त झालेल्या शिक्षकांचे समायोजन करणे आवश्यक आहे,अतिरिक्त झालेले बहुतांश शिक्षक बदली संदर्भातील निकषानुसार एकाच शाळेवर पाच वर्ष सेवाकाळ पुर्ण न झाल्यामुळे बदली करिता पात्र नाहीत व सेवा कनिष्ठ असल्यामुळे ऑनलाईन बदली पुर्वी समायोजन न केल्यास सदर शिक्षकांवर होणा-या बदली प्रक्रियेमध्ये अन्याय होण्याची शक्यता आहे,त्यामुळे शाळेवर अतिरिक्त झालेल्या शिक्षकांचे तात्काळ समायोजन करण्यात यावे,तसेच शिक्षण विस्तार अधिकारी,केंद्रप्रमुख,उच्चश्रेणी मुख्याध्यापक ही पदे अनेक वर्षांपासून रिक्त आहेत,अनेक वर्षापासून शिक्षकांच्या पदोन्नती प्रकरणे प्रलंबीत असल्यामुळे पदोन्नती प्रक्रियेची अंमलबजावणी सुद्धा आँनलाईन बदल्या प्रक्रियेपूर्वी करण्यात यावी.

दि.२६ नोव्हेंबर २०२१ रोजी महाराष्ट्र राज्य प्रहार शिक्षक संघटनेचे राज्याध्यक्ष यांच्या उपस्थितीत जिल्हा परिषद येथे संपन्न झालेल्या समस्या निवारण सभेमध्ये उपरोक्त विषयांवर निवेदनामार्फत मागणी करुन चर्चा करण्यात आलेली होती.याप्रसंगी एका महिण्यात पदोन्नती प्रक्रिया पूर्ण करण्याबाबतचे ईतीवृत्ताच्या माध्यमातुन लेखी आश्वासन प्रहार शिक्षक संघटनेला देण्यात आलेले होते परंतू तीन महिन्याचा कालावधी झाल्यानंतरही शिक्षकांच्या पदोन्नती संदर्भात कोणतीही आद्यापपर्यत अंमलबजावणी झालेली नाही.

सदर शिक्षकांच्या समस्या निकाली काढून शिक्षकावर होत असलेला अन्याय दुर करण्यात यावा अशी प्रहार शिक्षक संघटनेचे जिल्हाध्यक्ष महेंद्र रोठे यांनी सचिन जगताप शिक्षणाधिकारी (प्राथमिक) यांच्याकडे निवेदनामार्फत केली आहे.सदर निवेदनाच्या प्रतिलिपी शालेय शिक्षण मंत्री ना.बच्चुभाऊ कडु,व राज्याध्यक्ष महेशजी ठाकरे यांना देण्यात आलेल्या आहेत.

—————————————————–
ऑनलाईन बदली प्रक्रियापुर्वी शाळेवरील अतिरिक्त झालेल्या शिक्षकांचे समायोजन व शिक्षकांची पदोन्नतीत प्रक्रियेची अंमलबजावणी करून शिक्षकांवर होत असलेला अन्याय दूर करावा.
– महेंद्र रोठे
जिल्हाध्यक्ष,प्रहार शिक्षक संघटना बुलडाणा

Leave A Reply

Your email address will not be published.