Take a fresh look at your lifestyle.

अॅडव्होकेट शिवाजी सानप भाजपा जिल्हा अध्यक्ष पदासाठी घाटावरील इछुक

0

भारतीय जनता पार्टी चे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या नेतृत्वामध्ये राज्यात नवीन जिल्हाध्यक्षांच्या व पदाधिकाऱ्यांच्या नेमणुका करण्यात येणार आहे. त्यामध्ये बुलढाणा जिल्ह्यामध्ये पूर्वी एक जिल्हा अध्यक्ष असायचा. आता राज्यातील नेतृत्वाने बुलढाणा जिल्ह्यात दोन जिल्हा अध्यक्ष एक घाटावर व दुसरा घाटाखाली असे निवड करायचे ठरविले आहे. घाटावरील जिल्हा अध्यक्ष पदासाठी शिवाजी सानप हे इच्छुक असून. ते गेले 20 वर्षापासून भाजप पक्षासाठी अहोरात्र मेहनत घेऊन पक्ष वाढवत आहे.तसेच मेहकर मतदार संघ सिंदखेडराजा मतदार संघामध्ये कार्यकर्त्यांची चांगली मोट बांधलेली आहे.

पूर्वी ते लीगल सेलचे अध्यक्ष, तालुका सरचिटणीस ,तालुका अध्यक्ष व नंतर जिल्हा कार्यकारिणीवर सदस्य अशा पदावर त्यांनी पक्षाचा एक कार्यकर्ता म्हणून काम केले आहे त्यांचा जिल्ह्यामध्ये चांगला संपर्क असून पक्षासाठी नक्कीच पक्ष वाढीसाठी मेहनत घेऊन पक्षाच्या जास्तीत जास्त येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्था मध्ये सदस्य निवडून आणू शकतात .जातीय समीकरनाचा विचार केल्यास लोणार,सिंदखेड राजा ,देऊळगाव राजा तालुक्यात वंजारी समाज बहुसंख्य आहे व चिखली व बुलढाणा तालुक्यात वंजारी समाजाचे मतदान निर्णयक आहे. व घाटावर पंकजा मुंडे यांना मानणारा मोठा समाज आहे.शिवाजी सानप हे कट्टर पंकजा मुंडे समर्थक म्हणून ओळखले जातात. मध्ये ते घाटावर भाजप पक्ष पाहिजे तसा पक्ष वाढला नाही.त्यामुळे कार्यकर्ता मध्ये एकजूट नसून ती एकजूट निर्माण करण्याचे सुद्धा आवाहन नवीन जिल्हा अध्यक्ष यांच्या कडे राहील.

Leave A Reply

Your email address will not be published.