Take a fresh look at your lifestyle.

अंबरनाथ एमआयडीसीमध्ये बिस्कीट कंपनीला भीषण आग

0

आमचं चॅनेल (@Batmyaa) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

अंबरनाथ  : ठाणे (Thane) जिल्ह्यात सध्या कंपन्यांमध्ये आग लागण्याचे सत्रच सुरू झाले आहे. बुधवारी पहाटेच्या सुमारास शहापूर मधील वेहलोळी एमआयडीसीमधील (Vehloli MIDC) प्लास्टिक कंपनी जळून खाक झाल्याची घटना ताजी असतानाच आज पुन्हा अंबरनाथमधील एमआयडीसी (Ambernath MIDC) भागात असलेल्या आर के वन नावाच्या बिस्कीट कंपनीला (RK One Biscuit Company) भीषण आग लागल्याचे समोर आले आहे.आग इतकी भीषण आहे की, दोन ते तीन किलोमीटरच्या अंतरावरून आगीच्या धुराचे लोट दिसत आहेत.

सकाळी सव्वा सहाच्या सुमारास या कंपनीला आग लागल्याची माहिती मिळते आहे. कंपनीत कामगार काम करत असताना ही आग लागल्याची माहिती अग्नीशमन दलाने दिली.आग लागल्यावर सर्व कामगार कंपनीच्या बाहेर पडले,आग मोठी असल्याने बघ्यांची मोठ्या प्रमाणात गर्दी या ठिकाणी झाली होती. त्यामुळे पोलिसांनी आगीच्या ठिकाणी धाव घेत गर्दी कमी करण्याचे काम केले. सुदैवाने आतापर्यत तरी या आगीमुळे कोणालाही दुखापत झाली नसून जीवितहानीची माहिती देखील समोर आलेली नाही.

मात्र, आगीमुळे कंपनी चे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. आगीचे भीषण रूप पाहता संपूर्ण कंपनी आगीच्या भक्ष्यस्थानी पडल्याने कंपनीला आगीचा अक्षरश: वेढा पडला आहे. या कंपनीच्या शेजारी असलेल्या कंपन्यांना आगीची झळ बसून त्या आगीच्या भक्ष्यस्थानी पडू नये म्हणून अग्निशमन दलाचे शर्तीचे प्रयत्न सुरू आहेत. या भीषण आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी अंबरनाथ पालिकेच्या 2 आणि अंबरनाथ एमआयडीसीच्या 2 उल्हासनगर 1 कल्याण डोंबिवली 1 अशा 6 फायरब्रिगेड आणि पाण्याचे टँकर घटनास्थळी दाखल झाले असून आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी  प्रयत्न सुरू आहेत.

दरम्यान, कंपनीला आग कशामुळे लागली याचे कारण अजून समोर आलेले नाही. मात्र शॉर्टसर्किटमुळे लाग लागल्याचा अंदाज वर्तवली जात आहे. या कंपनीत बिस्कीट बनवण्यासाठी लागणारा कच्च माल मोठ्या प्रमाणात होता. तो संपूर्ण माल, यंत्र सामुग्री आगीच्या भक्ष्यस्थानी पडली असून कंपनी जाळून खाक झाली आहे. गेल्या काही दिवसांपासून विशेषतः मार्च महिन्यात ठाणे जिल्ह्यातील कंपन्यांना आगी लागण्याचे प्रकार मोठ्या प्रमाणावर वाढले असल्याचे समोर येत आहे.

 

वार्ताहर नेमणे आहेत

मराठी बातम्या मिळवा आता टेलीग्रामवर.. आमचं चॅनेल (@Batmyaa) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Leave A Reply

Your email address will not be published.