Take a fresh look at your lifestyle.

बापरे! स्वयंपाक घरात लुडबुड करणारा आवळा आणि जिरे आपल्या शरीरावर असे परिणाम करतात, की तुम्ही पुन्हा त्यांना विसरणारच नाही

0

आमचं चॅनेल (@Batmyaa) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

आरोग्यम् धनसंपदा असे आपल्याकडे बोलले जाते. सोबतच आपले आरोग्य निरोगी राहण्यासाठी आपण नेहमीच आपल्या आरोग्याची काळजी घेत असतो. तर कधी कधी आरोग्य निरोगी ठेवण्यासाठी आपण घरगुती उपायांचा वापर करत असतो.मात्र कित्येकदा आपण दैनंदिन जीवनात वापरत असलेल्या स्वयंपाक घरातील काही पदार्थ आपल्याला आपले आरोग्य निरोगी ठेवण्यास मदत करतात, हेच आपल्याला माहीत नसते.

त्यामुळे आपण कित्येकदा आपले आरोग्य निरोगी ठेवण्यासाठी आयुर्वेदिक औषधे किंवा डॉक्टरांचा सल्ला घेतो. मात्र आज आम्ही तुम्हाला स्वयंपाक घरात वापरण्यात येणाऱ्या दोन अशा वस्तूंची आपल्या आरोग्यावर होणाऱ्या परिणामांची माहिती देणार आहोत.या दोन गोष्टी म्हणजे आवळा आणि जिरे. तुम्हाला विश्वास बसणार नाही पण आवळा आणि जिरे हे आपल्याला आपले आरोग्य निरोगी आणि संतुलित ठेवण्यास मदत करते. ते कसे ते आपण पाहणारच आहोत.

त्यापूर्वी आवळा आणि जिऱ्याचे एकत्रित फायदे काय हे आपण पाहुयात.

जिरे रात्रभर भिजत घाला आणि सकाळी उठल्यानंतर त्यात आवळ्याचा रस मिसळा. आणि हे मिश्रण सकाळी रिकाम्या पोटी प्या. यामुळे पोटाची समस्या दूर होते. बद्धकोष्ठता आणि पित्त, वजन कमी करणे, जळजळ, मधुमेह, रक्तदाब, पचन क्रिया सुधारणे आणि निरोगी त्वचा मिळते अशा सारखे अनेक फायदे आपल्याला या मिश्रणामुळे आपल्या आरोग्यास होतात.

तसेच आता आपण आपल्या आरोग्यावर जिऱ्याचे काय फायदे होतात हे पाहणार आहोत.

१) जिरे हे पोटॅशियम, कॅल्शियम, तांबे समृध्द असते. जिऱ्यामध्ये थायमोक्विनॉन देखील असते जे यकृताला संरक्षण देते आणि सूज कमी करते. तसेच, जिरे हे रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित करते. त्यामुळे जिऱ्याचा फायदा हा मधुमेह असलेल्या लोकांनासुद्धा होतो.

२) आवळा आणि जिऱ्याचे पेय मेटाबॉलिज्म गतिमान करण्यात मोठ्या प्रमाणात मदत करते. त्यामुळे जर आपल्याला वजन कमी करायचे असेल तर दररोज आवळा आणि जिरे बनलेले पेय प्यायला हवे.

३) पोट फुगणे, पुरळ आणि सूज अशा सारख्या पोटाच्या समस्या दूर करण्यास जिरे खूप मोठ्या प्रमाणात मदत करते. त्यामूळे जिरे हे आपल्या आरोग्यास खूप गुणकारी असते.

हे झाले जिऱ्याचे फायदे मात्र आता आपण आवळ्याचेही फायदे पाहणार आहोत.

१) आवळ्यामध्ये व्हिटॅमिन सी, लोह, कॅल्शियम आणि फॉस्फरस असते. त्यामुळे आवळा आपली पचनशक्ती सुधारते. आणि आपल्याला चमकणारी त्वचा मिळविण्यात मदत करते.

२) आवळा हे अनेक प्रकारच्या पॉलिफेनोल्सने समृद्ध आहे. त्यामुळे आवळा कर्करोगाच्या पेशींच्या वाढीविरुद्ध लढायला प्रभावी ठरू शकतो.

३) वात, कफ आणि पित्त या तिन्ही गोष्टींशी लढून शरीर संतुलित ठेवण्यास आवळा खूप मोठ्या प्रमाणात मदत करतो.

४) आवळ्यात असणाऱ्या अमीनो ॲसिडमुळे केसांची वाढ, केस गळती, आणि केसांच्या प्रत्येक समस्येवर मात करण्यास आवळा मदत करतो. त्यामुळे केस आणि त्वचा निरोगी राहते.

५) आवळा व्हिटॅमिन सीचा उत्कृष्ट स्रोत आहे. बॅक्टेरियापासून संरक्षण करण्यासोबत आवळा आपली रोग प्रतिकारशक्ती वाढवते. तसेच व्हिटॅमिन सी समृद्ध असलेला आवळा अँटिऑक्सिडेंटचाही चांगला स्रोत आहे. यामुळे आपल्या आरोग्यास अनेक फायदे होतात. व आपले आरोग्य निरोगी राहण्यास मदत होते.

तर हे होते आपल्या स्वयंपाक घरात लुडबुड करणाऱ्या आवळा आणि जिऱ्याची आरोग्यावर होणारे उत्कृष्ट फायदे.

-निवास उद्धव गायकवाड

 

वार्ताहर नेमणे आहेत

मराठी बातम्या मिळवा आता टेलीग्रामवर.. आमचं चॅनेल (@Batmyaa) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Leave A Reply

Your email address will not be published.