Take a fresh look at your lifestyle.

…आणि शिवसैनिक लाठ्याकाठ्या घेऊन स्मशानभूमीत पोहोचले!

अमरावतीमधील हिंदू स्मशानभूमीत गॅस दाहिनी बसविण्याच्या मुद्द्यावरून शिवसेना व भाजपचे कार्यकर्ते आमनेसामने आले असून शिवसैनिकांनी भाजपला थेट आव्हान दिलं आहे.

0

हायलाइट्स:

  • स्मशानभूमीतील गॅस दाहिनीवरून शिवसेना-भाजप आमनेसामने
  • लाठ्याकाठ्या घेऊन शिवसैनिक पोहोचले स्मशानभूमीत
  • काम थांबवून दाखवा, शिवसेनेचं भाजपला खुलं आव्हान

अमरावती: अमरावती शहरातील हिंदू स्मशानभूमीत लावण्यात येणाऱ्या गॅस दाहिनीवरून (Gas Crematorium in Amravati) शिवसेना व भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते आमनेसामने आले आहेत. गॅस दाहिनीला विरोध करणाऱ्या भाजपला प्रत्युत्तर देण्यासाठी सोमवारी शिवसैनिक थेट लाठ्याकाठ्या घेऊन स्मशानभूमीत पोहोचले. त्यामुळं तणाव निर्माण झाला होता.

अमरावतीमधील हिंदू स्मशानभूमीत जिल्हा प्रशासनातर्फे गॅस दाहिनी उभारण्यात येत आहे. त्यावरून मागील दहा दिवसांपासून राजकारण तापलं आहे. भाजपनं गॅस दाहिनी बसवण्यास विरोध केला आहे. भाजपचे प्रवक्ते शिवराय कुलकर्णी यांनी काही दिवसांपूर्वी स्थानिकांसह तिथं मूक आंदोलन केलं होतं. त्यानंतर भाजपच्या काही नगरसेवकांसह कार्यकर्त्यांनी गॅस दाहिनीला विरोध करत आंदोलन केले होते. तसंच, तिथं मोठ्या प्रमाणात तोडफोड केली होती. मनसेच्या कार्यकर्त्यांनीही या आंदोलनात भाजपची साथ दिली होती. मात्र हा विरोध झुगारून महापालिका व जिल्हा प्रशासनानं गॅस दाहिनी उभारण्याचं काम सुरू केलं होतं. या कामाला विरोध करण्यासाठी कुलकर्णी यांच्यासह भाजपचे काही कार्यकर्ते येणार असल्याची माहिती शिवसेनेच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांना मिळाली. ही माहिती मिळताच शिवसेनेचे शहर प्रमुख पराग गुढदे यांनी शिवसैनिकांसह लाठ्याकाठ्या घेऊन तिथं धाव घेतली. हिंमत असेल तर कुलकर्णी व भाजपच्या कार्यकर्त्यांनी विरोध करून दाखवावा. त्यांना लाठ्यांचा प्रसाद देऊ, असा इशारा शिवसेनेचे पराग गुढदे यांनी यावेळी दिला. अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलिसांनी या परिसरात कडक बंदोबस्त ठेवला होता.

 


[cardoza_facebook_like_box]

वार्ताहर नेमणे आहेत

मराठी बातम्या मिळवा आता टेलीग्रामवर.. आमचं चॅनेल (@Batmyaa) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Leave A Reply

Your email address will not be published.