Take a fresh look at your lifestyle.

रोमानियाच्या बॉर्डरवर हिमवृष्टीचा सामना! अमरावतीच्या वृषभचा रोमानियात तर स्नेहा लांडगेचा पोलंडमध्ये प्रवेश

रात्रंदिवस मोकळ्या आकाशात हिमवर्षावात आम्ही दिवस काढत आहोत. कोणता दिवस शेवटचा होईल, काही सांगता येत नाही. कुणाच्या भीतीमुळं आम्ही मरणार नाही. पण, या कडाक्याच्या थंडीमुळं नक्कीच मरणार आहोत.

0

अमरावती : जिल्ह्यातील 11 विद्यार्थी हे युक्रेनमध्ये अडकले होते. त्यापैकी दोन विद्यार्थी अमरावतीमध्ये दाखल झाले तर एक विद्यार्थी दिल्लीत दाखल झालेला आहे. अमरावती येथील दोन विद्यार्थी युद्धाच्या दृष्टीने अतिशय संवेदनशील समजल्या जाणाऱ्या खारकीव या भागात होते. दोन दिवसांपूर्वी हे दोघेही खारकीव येथून निघाले. ऋषभ गजभिये याने रोमानियाची बॉर्डर क्रॉस (Romania Border Cross) करून रोमानियात प्रवेश केला. तो भारतीय दूतावासाच्या टेन्टमध्ये आहे. तर स्नेहा लांडगे हिने पोलंडमध्ये प्रवेश केल्याची माहिती पालकांनी दिली आहे. रोमानियाच्या बॉर्डरवर मायनस 10 डिग्री सेल्सिअस तापमान आहे. या बॉर्डरवर बर्फवृष्टीसुद्धा होत आहे. तीन दिवसांपासून अनेक भारतीय विद्यार्थी त्या रोमानिया बॉर्डरवर या बर्फवृष्टीचा (Snowfall on Border) सामना करत आहेत. रात्र काढत आहेत. त्यांनी भारतीय व रोमानिया दूतावासाकडून (Embassy of India) सहकार्य मिळत नसल्याबद्दल खंतही व्यक्त केली.

कसे काढले दिवस

रोमानिया बॉर्डरवर तीन दिवस उभं राहावं लागलं. खाण्यापिण्याची कोणतीही सोय नव्हती. अशात हिमवृष्टी झाली. युद्धात नव्हे, तर आपसी लोकांसोबतच निसर्गाचा विरुद्ध लढावं लागतंय. भारतीय राजदूतांशी लढतोय, असं इथले नागरिक सांगतात. असं करू नका, अशी विनवणी हे नागरिक करत आहेत. हिमवृष्टी ही जोरात सुरू आहे. राहण्यासाठी छतही नाही. लोकांना आपल्या घरी जाण्याची परवानगी मिळावी. आम्ही काही जनावरं नाहीत. आम्हाला समजून घेण्याचा प्रयत्न करा. हे आता थांबवा. आम्हीला खूप वेदना होत आहेत.

थंडीमुळं मरणार

रात्रंदिवस मोकळ्या आकाशात हिमवर्षावात आम्ही दिवस काढत आहोत. कोणता दिवस शेवटचा होईल, काही सांगता येत नाही. कुणाच्या भीतीमुळं आम्ही मरणार नाही. पण, या कडाक्याच्या थंडीमुळं नक्कीच मरणार आहोत. भारत सरकारनं यासंदर्भात जरूर विचार केला पाहिजे. भारतीय दूतावासाचा एकही व्यक्ती इथं नाही. आम्ही भारताचे नागरिक आहोत. त्यामुळं भारतीय दूतावासाची ही जबाबदारी आहे. आमची सुटका करणे शक्य नव्हते, तर तसं आम्हाला कळवायला हवं होतं. तुम्ही तुमचं बघा. याला जबाबदार कोण, असा सवालही संतप्त युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीय नागरिकांनी विचारला.

Leave A Reply

Your email address will not be published.