जि.प.शाळा कठोरा येथे स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव उत्साहात साजरा
शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष सुनिल खवले यांच्या हस्ते ध्वजारोहण
शेगांव :
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कठोरा येथे आझादी का अमृत महोत्सवांतर्गत सरपंच सुषमाताई खवले व आदी मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष सुनिल खवले यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.
याप्रसंगी शाळेत आझादी का अमृत महोत्सवानिमित्त शाळेमध्ये राबविण्यात येणारे विविध उपक्रमाबद्दल व स्वातंत्र्य दिनाची माहिती उच्चश्रेणी मुख्याध्यापक सुनिल घावट यांनी याप्रसंगी उपस्थितांनी दिली.
सदर कार्यक्रमाला शाळा व्यवस्थापन समितीचे सदस्य, ग्रामपंचायत कार्यालयाचे सदस्य,अंगणवाडी कर्मचारी,आशा वर्कर,बचतगटातील महिला सदस्य,तंटामुक्तीचे सदस्य, पोलीस पाटील,शाळेतील शिक्षक सुरेश डोसे,संजय महाले,सचिन वडाळ,सचिन गावंडे, अर्जुन गिरी तसेच गावातील प्रतिष्ठित नागरिक बहुसंख्येने उपस्थित होते.