Take a fresh look at your lifestyle.

Earthquake : महाराष्ट्रापासून जम्मू-काश्मीरपर्यंत भूकंपाचे धक्के; जाणून घ्या, किती होती तीव्रता

महाराष्ट्रापासून जम्मू-काश्मीरपर्यंत देशात भूकंपाचे धक्के

0

Earthquake : महाराष्ट्रापासून जम्मू-काश्मीरपर्यंत देशात भूकंपाचे धक्के जाणवले आहेत. नॅशनल सेंटर फॉर सिस्मॉलॉजीनुसार महाराष्ट्रात भूकंपाची तीव्रता 3.9 रिश्टर स्केल आणि काश्मीरमध्ये 3.4 इतकी होती. जम्मू-काश्मीरमध्ये आज पहाटे 3.28 च्या सुमारास हे धक्के जाणवले. कटरापासून ६२ किमी अंतरावर ईशान्य-उत्तर भागात भूकंपाचे धक्के जाणवल्याची माहिती नॅशनल सेंटर फॉर सिस्मॉलॉजीने दिली आहे. भारतासह अफगाणिस्तानातील काबूलमध्येही भूकंपाचे धक्के जाणवल्याचे सांगितले जात आहे.

कोल्हापूरपासून पूर्वेला १७१ किमी अंतरावर महाराष्ट्रात मध्यरात्री २:२१ च्या सुमारास ३.९ तीव्रतेचा भूकंपाचे हादरे जाणवले. भूकंपाचा प्रभाव जमिनीच्या 10 किलोमीटर खाली होता. तर, काश्मीरमध्ये पहाटे ३:२८ वाजण्याचा सुमारास जाणवलेले भूकंपाचा केंद्रबिंदू जमिनीच्या खाली पाच किलोमीटरपर्यंत होता. अफगाणिस्तानच्या काबुलमध्ये मध्यरात्री 2:55 वाजण्याच्या सुमारास जाणवलेल्या भूकंपाची तीव्रता 4.3 इतकी रिस्टर स्केल होती. येथील भूकंपाचा केंद्रबिंदू जमिनीच्या खाली 80 किमी खोलीवर होता. सध्या या सर्व ठिकाणी जाणवलेल्या भूकंपामुळे उद्भवलेल्या परिस्थितीबाबत अधिकचे अपडेट्स येणे बाकी आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.