Take a fresh look at your lifestyle.

रस्त्यावरील भारताच्या आकाराचा खड्डा पाहून आनंद महिंद्रांनाही बसला धक्का; फोटो पोस्ट करत म्हणाले…

या पोस्टमध्ये आपण रस्त्यावरील एक खड्डा पाहू शकतो. पण जर तुम्ही नीट पाहिले तर तुम्हाला कळेल की या खड्ड्याचा आकार भारताच्या नकाशासारखा आहे.

0

आनंद महिंद्रा हे भारतातील प्रसिद्ध आणि नामांकित उद्योजकांपैकी एक आहेत. त्यांनी भारतातच नाही तर भारताबाहेरही नाव कमावले आहे. आजच्या तरुण पिढीचे ते आदर्श आहेत आणि तेही तरुणांना प्रोत्साहन देण्यासाठी आणि मार्गदर्शन करण्यासाठी अनेक गोष्टी करत असतात. आनंद महिंद्रा सोशल मीडियावर बरेच सक्रिय असतात. ते नेहमी वेगवेगळ्या पोस्ट आपल्या सोशल मीडिया अकाउंटवरून शेअर करत असतात. या पोस्ट बऱ्याच व्हायरलही होतात.

सध्या त्यांनी ट्विटरवर अशीच एक पोस्ट रिट्विट केली आहे. ही पोस्ट पाहिल्यावर ते स्वतःही हैराण झाले आहेत असं दिसतंय. कारण त्यांनी या पोस्टसह आश्चर्यचकित झालेली इमोजी शेअर केली आहे. ही पोस्ट सध्या खूप व्हायरल होत आहे. या पोस्टमध्ये आपण रस्त्यावरील एक खड्डा पाहू शकतो. पण जर तुम्ही नीट पाहिले तर तुम्हाला कळेल की या खड्ड्याचा आकार भारताच्या नकाशासारखा आहे. सुगातो बोस यांनी शेअर केलेली पोस्ट आनंद महिंद्रा यांनी रिट्विट केली आहे.

सुगातो याने आपल्या पोस्टच्या कॅप्शनमध्ये म्हटलंय, “भारतातील खड्डे एका लहानशा देशाच्या आकारातील आहेत.” आनंद महिंद्रा यांनी हा व्हायरल फोटो आश्चर्यचकित झालेल्या इमोजीसह शेअर केला आहे. या पोस्टवर अनेक नेटकरी कमेंट करत आहे. काहीजण या फोटोला मीम मटेरियल म्हणत आहेत, तर काहीजण म्हणत आहेत की हा मॉर्फ केलेला फोटो आहे.

याआधी आनंद महिंद्रा यांनी एक व्हिडीओ शेअर केला होता. त्यांनी म्हटलं होतं की हे इनोव्हेशन भारतातील रस्त्यांसाठी गरजेचे आहे.

व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये त्यांनी म्हटलं होतं, “मी म्हणेन की हा एक नावीन्यपूर्ण उपक्रम आहे जो भारतासाठी आवश्यक आहे. काही बांधकाम साहित्य कंपनीला एकतर त्याचे अनुकरण करावे लागेल किंवा या फर्मशी सहयोग करून ते येथून बाहेर आणावे लागेल!” हा व्हिडीओही बराच व्हायरल झाला होता.

Leave A Reply

Your email address will not be published.