Take a fresh look at your lifestyle.

समाज कल्याण शिष्यवृत्तीचे प्रस्ताव तालुकास्तरावर स्वीकारण्याच्या कॅम्पचे आयोजन करा

जिल्हा समाज कल्याण अधिकारी यांच्याकडे प्रहार शिक्षक संघटनेचे जिल्हाध्यक्ष महेंद्र रोठे यांची निवेदनामार्फत मागणी

0

बुलडाणा :
सेवा पंधरवाडा कालावधीमध्ये समाजकल्याण विभागाअंतर्गत सन २०२२ – २०२३ मध्ये शालेय विद्यार्थ्यांना अदा करण्यात येत असलेल्या विविध शिष्यवृत्तीचे प्रस्ताव यावर्षी जिल्हयातील सर्व मुख्याध्यापकांना समाजकल्याण कल्याण कार्यालय,जिल्हा परिषद बुलडाणा येथे जिल्हास्तरावर उपस्थित राहून सादर करण्याचे आदेश निर्गमित करण्यात आलेले आहेत.

अनेक वर्षांपासून समाज कल्याण शिष्यवृत्तीचे प्रस्ताव पंचायत समिती येथे तालुकास्तरिय कॅम्पचे आयोजन करून स्वीकारण्यात येत होते,परंतू यावर्षी तालुकास्तराऐवजी जिल्हास्तरावर प्रस्ताव स्वीकारण्याच्या आयोजनामध्ये आकस्मिकपणे बदल करण्यात आलेला असल्यामुळे मुख्याध्यापकांना अनेक समस्या उद्भवलेल्या आहेत.

यामध्ये प्रामुख्याने बुलडाणा हे ठिकाण अनेक तालुक्यासाठी मध्यवर्ती ठिकाण नाही,अनेक तालुके किलोमीटरच्या अंतराने जिल्हयापासुन दुरवर असल्यामुळे समाज कल्याण शिष्यवृत्तीचे प्रस्ताव सादर करण्यासाठी मुख्याध्यापकांचा जास्तीत जास्त वेळ प्रवासाच्या व्यस्ततेत जाऊन आर्थिक अडचणीला पण सामोरे जावे लागणार आहे.

तालुकास्तराऐवजी जिल्हास्तरावर शिष्यवृत्ती कॅम्पच्या आयोजन करण्यात आलेली बदलाची कार्यपद्धती मुख्याध्यापकांना अतिशय त्रासदायक असल्यामुळे मुख्याध्यापकांच्या समस्याचा सहानुभूतीपूर्वक विचार करून शिष्यवृत्ती कॅम्पचे आयोजन तालुकास्तरावर करण्यात यावे अशी प्रहार शिक्षक संघटनेचे जिल्हाध्यक्ष महेंद्र रोठे यांनी जिल्हा समाज कल्याण अधिकार यांच्याकडे निवेदनामार्फत केली आहे.

समाज कल्याण शिष्यवृत्ती प्रस्ताव जिल्हास्तरावर स्वीकारण्याच्या आयोजन कार्यपध्दतीमध्ये यावर्षी बदल केल्यामुळे मुख्याध्यापकांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागणार आहे,शिष्यवृत्ती प्रस्तावामध्ये त्रुट्या आढळल्यास त्रुटीची पुर्तता करण्यासाठी मुख्याध्यापकांना जिल्हास्तरावर पाठपुरावा करावा लागणार आहे,तसेच जिल्हयातील मुख्याध्यापकांच्या उद्भवलेल्या समस्यांचा सहानुभूतीपूर्वक विचार करून दरवर्षीप्रमाणे जिल्हास्तराऐवजी तालुकास्तरावर शिष्यवृत्ती कॅम्पचे आयोजन करण्यात यावे.

– महेंद्र रोठे,जिल्हाध्यक्ष
जिल्हा प्रहार शिक्षक संघटना
बुलडाणा

 

Leave A Reply

Your email address will not be published.