सेवा आघाडी बुलढाण्याच्या जिल्हा कार्याध्यक्षपदी मंगेश भोरसे व जिल्हा संघटकपदी प्रशांत हिंगे यांची नियुक्ती
बुलडाणा :
सेवा आघाडीचे राज्याध्यक्ष पन्हाळे व राज्यसेवा आघाडीचे संघटक विजूभाऊ चोपडे, विभाग सचिव रमेशजी आकोटकार यांनी राज्य संघटनेच्या मान्यतेनुसार एका परिपत्रकान्वये मंगेश सुभाष भोरसे यांची सेवा आघाडीच्या जिल्हा कार्याध्यक्ष पदी तर बुलडाणा (दक्षिण) जिल्हा संघटक या पदावर व श्री प्रशांत जगन्नाथ हिंगे यांची निवड केली आहे.

सामाजिक कार्यात अग्रेसर असणारे मंगेश भोरसे व प्रशांत हिंगे यांच्या उल्लेखनीय सामाजिक कार्याची दखल घेऊन त्याची सदर पदावर सर्वानुमते निवड करण्यात आलेली आहे.
सदर नियुक्ती झालेले जिल्हा कार्याध्यक्ष मंगेश भोरसे व जिल्हा संघटक प्रशांत हिंगे यांचे म.प्रा.तै.म.अकोला विभाग सेवा आघाडीचे अध्यक्ष गोपाल भुजबले यांनी शुभेच्छा देऊन अभिनंदन केले आहे.त्यांचा नियुक्तीबद्दल संघटेच्या पदाधिका-याकडून व सामाजिक मित्र परिवाराकडून त्यांच्या नियुक्तीबद्दल अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.