Take a fresh look at your lifestyle.

लग्नाची वरात, बैल गाडीने मांडवात

0

लोणार : 
तालुक्यातील पार्डा दराडे येथील विवाहाची परिसरात जोरदार चर्चा होत आहे.पार्डा दराडे येथील उद्धवराव नारायणराव दराडे यांचे चिरंजीव बालुप्रसाद व गावातीलच गणेश महादराव जायभाये यांची कन्या विद्या यांचा विवाह अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडला. नवरदेवाची वरात ही जुन्या रुढी परंपरेनुसार बैल गाडी सजवून गाडी मध्ये वरात काढण्यात आली यामुळे या विवाहाची जोरदार चर्चा होत आहे.या मध्ये नवरदेव कडील मंडळी ने समाजा मध्ये नवीन आदर्श निर्माण केला.शेतकरी हा वर्षभर आपली शेती बैलां वर करतो.वर्ष भर ते बैल आपल्या मालकाला आपल्या कामातून आपली ताकद दाखवतात.त्या बैलाला मान फक्त पोळा या सनालाच असतो पण हा शेतकरी पुत्र चिरंजीव बालू प्रसाद यांनी आपल्या विवाहाला आपली वरात आपल्या लाडक्या बैलांना सजवून गाडी मध्ये वरात काढली.या मुळे या शेतकरी पुत्राच्या चेहऱ्यावर आनंद दिसत होता. या विवाह सोहळ्यासाठी मेहकर मतदार संघाचे आमदार डॉ संजय रायमूलकर साहेब सिंदखेडराजा मतदार संघाचे माझी आमदार तोताराम कायंदे , खासदार प्रतापराव जाधव यांचे बंधू माधवराव जाधव माझी सभापती कु उ.बा. समिती मेहकर बळीराम मापारी जिल्हा प्रमुख शिवसेना बुलढाणा नंदुभाऊ मापारी अध्यक्ष शिवशत्र मित्रमंडळ लोणार व तालुक्यातील ईतर आजी माझी पदाधिकारी पाहुणे मंडळी मित्र मंडळी हे उपस्थित होते. या सर्व विवाह सोहळ्याचे नियोजन समस्त दराडे परिवार व गावकरी मंडळी यांनी केले अशी माहिती रामकिसन दराडे अध्यक्ष संगणक परिचालक संघटना लोणार यांनी दिली .

Leave A Reply

Your email address will not be published.