Take a fresh look at your lifestyle.

प्रामाणिकता! लहान मुलगी समुद्रात बुडत असताना कुत्र्याने वाचवले प्राण; बघा व्हायरल व्हिडीओ

हा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. नेटीझन्स भरभरून कुत्र्याचे कौतुक करत आहेत.

0

अनेकांचा सर्वात चांगला मित्र म्हणजे कुत्रा. कुत्रा हा प्राणी अनेकांच्या घरात सोबत राहतात. दुःख आणि आनंदात तेही असतात. सोशल मीडियावर आपण अनेकदा कुत्र्यांचे व्हिडीओ शेअर करतो. नेहमी प्रमाणे आजही एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये एका कुत्र्याने धैर्याने मालकाच्या मुलीला पाण्यातून वाचवले आणि सिद्ध केले की ते खरोखर निष्ठावंत,प्रामाणिक आहे. हा व्हिडीओ पाहून प्रत्येकजण कुत्र्याचे कौतुक करत आहे.

काय आहे व्हिडीओमध्ये?

व्हिडीओमध्ये पाहिले जाऊ शकते की एक लहान मुलगी समुद्राजवळ खेळत आहे, तेव्हाच एक कुत्रा तिथे उभा आहे. तेव्हा समुद्राची लाट खूप वेगाने येते आणि मुलीला भिजवते. हे पाहिल्यानंतर कुत्र्याला वाटते की मूल सुरक्षित नाही. अशा पस्थितीत तो ठरवतो की मुलीला पाण्यातून बाहेर काढावे. व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की हा कुत्रा त्याच्या तोंडाने कसे तिला वाचवण्याचा प्रयत्न करतो. तो वारंवार तोंडाने ओढतो आणि तिला किनाऱ्यावरून जमिनीवर घेऊन जातो.

नेटीझन्सच्या प्रतिक्रिया

हा व्हिडीओ thedodo या युट्युब चॅनेलवरून हँडलवरून शेअर केला गेला आहे. या व्हिडीओला एक मस्त कॅप्शन देण्यात आले आहे.हा व्हिडिओ सोशल मीडियावर आतापर्यंत ३ लाखांपेक्षा जास्त वेळा पाहिला गेला आहे. त्याचबरोबर २० हजारांहून अधिक लोकांनी या व्हिडीओ लाईक केलं आहे. प्रत्येकाला हा व्हिडीओ खूप आवडत आहे.

 

 


[cardoza_facebook_like_box]

वार्ताहर नेमणे आहेत

मराठी बातम्या मिळवा आता टेलीग्रामवर.. आमचं चॅनेल (@Batmyaa) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Leave A Reply

Your email address will not be published.