जि.प.शाळा कठोरा येथे भारतरत्न डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती उत्साहात साजरी
शेगांव :
पंचायत समिती अंतर्गत जिल्हा परिषद केंद्रीय उच्च मराठी प्राथमिक शाळा कठोरा येथे भारतरत्न डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली,भारतरत्न डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आले.
याप्रसंगी मनिषा मस्के,आरती जाधव,आदिती खवले,समिक्षा खवले,भुमिका तावडे,प्रणाली जाधव,ज्ञानेश्वरी खवले,कोमल खवले,जान्हवी वाघ या विद्यार्थ्यांनी व मुख्याध्यापक सुनिल घावट, शिक्षक सुरेश डोसे,संजय महाले,सचिन वडाळ,अर्जुन गिरी,सचिन गावंडे यांनी भाषणामधून डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्याबद्दल विस्तृत माहिती सांगितली.

थोर महात्मे होऊन गेले,चारित्र्य त्यांचे पहा जरा,आपणही त्यांच्या समान व्हावे हाच सापडे बोध खरा या उक्तीनुसार विद्यार्थ्यांनी भारतरत्न डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांच्यापासून अभ्यास करण्याचा गुण घ्यावा असे आवाहन करण्यात आले.
याप्रसंगी शालेय पोषण आहार कर्मचारी कविता गवळी व बहुसंख्येने विद्यार्थ्यांची उपस्थिती होती.