Take a fresh look at your lifestyle.

अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांच्या राजीनाम्याची भाजपा लोणार ची मागणी…

0

उध्दव नागरे
लोणार :
तालुका प्रतिनिधी

आज दिनांक 24 फेब्रुवारी रोजी भारतीय जनता पार्टी लोणार च्या वतीने माननीय तहसीलदार लोणार यांना निवेदनाद्वारे महाराष्ट्र राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांचा राजीनामा घेणे बाबत निवेदन देण्यात आले,महा विकास आघाडी सरकारमध्ये अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांच्यावर अवैध जमीन खरेदी प्रकरण असो,याकूब मेमन फाशी रद्द करण्यासाठी धडपड असो,असलम शेख यांना मंत्रीपद देणे असो व तसेच दाऊद च्या प्रॉपर्टीची खरेदी करताना दाऊदला वाचवण्याचा उद्देश होता. त्यांच्यासोबत व्यावसायिक संबंध अधिक मजबूत करण्याचे काम होते,याचे उत्तर महा विकास आघाडीने दिले पाहिजे पण चोर तो चोर आणि वर शिरजोर अशा या म्हणीप्रमाणे नवाब मलिक यांच्या बाबतीत महा विकास आघाडीचे धोरण आहे हे सिद्ध होते तरी अशा भ्रष्ट व देशद्रोही सोबत संबंध ठेवणाऱ्या मंत्री नवाब मलिक याचा तात्काळ नैतिकतेच्या आधारावर राजीनामा घ्यावा याकरिता निवेदन देण्यात आले.

गुन्हेगारांना पाठिशी घालणाऱ्या सरकार विरोधात आंदोलन करुन
नवाब मलिक यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी व त्यांना पाठीशी घालणाऱ्या महाराष्ट्र सरकार विरोधात तहसील कार्यालय येथे
निवेदन देताना भाजपा शहराध्यक्ष गजानन मापारी,विजय मापारी, भगवानराव सानप,प्रकाश महाराज मुंडे,जिल्हा उपाध्यक्ष मारुतराव सुरुशे,युवा मोर्चा जिल्हा सचिव उद्धव आटोळे, तालुका सरचिटणीस प्रकाश नागरे,गणेश तांगडे,तालुका उपाध्यक्ष सुरेश अंभोरे,गजानन वाघ,अल्पसंख्यांक तालुकाध्यक्ष शेख जावेद, किसान आघाडी तालुकाध्यक्ष गणेश गाडेकर,गजानन डव्हळे, कृष्णा राठोड,रामा मापारी,विनोद थोरवे सोबतच पदाधिकारी व कार्यकर्ते हजर होते.

Leave A Reply

Your email address will not be published.