Take a fresh look at your lifestyle.

छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती कठोरा येथे उत्साहात साजरी

0

शेगांव : 
रयतेचा राजा असं म्हटलं की समोर छत्रपती शिवाजी महाराजांशिवाय दुसरं कुठलं नाव येत नाही असे हिंदवी स्वराज्य संस्थापक शिवाजी महाराज यांची जयंती जिल्हा परिषद केंद्रीय उच्च मराठी प्राथमिक शाळा कठोरा येथे उत्साहात साजरी करण्यात आली.

शाळेचे उच्चश्रेणी मुख्याध्यापक सुनिल घावट व कार्यक्रम प्रमुख अतिथी म्हणून लाभलेले स्वस्त धान्य दुकानदार बाबुराव खवले यांच्या हस्ते शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पुष्पहार अर्पण करून पुजन करण्यात आले.

अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतही महाराजांनी अनेक शौर्याचे पराक्रम केले आहेत,छत्रपती शिवाजी महाराजांचे आदर्श विद्यार्थ्यांनी जोपासावे,आदर्श पुत्र, सावध नेता, कुशल संघटक, दुर्जनांचा कर्दन काळ, एका नव्या युगाचा निर्माता, रयतेचा राजा, बलाढ्य योद्धा असे महाराजांच्या अंगी असलेल्या अष्टपैलू गुणांचे विद्यार्थ्यांनी अनुकरण करावे असे मनोगत याप्रसंगी उच्चश्रेणी मुख्याध्यापक सुनिल घावट यांनी व्यक्त केले.

याप्रसंगी शिक्षक सुरेश डोसे,संजय महाले,पुरूषोत्तम सपकाळ,सचिन वडाळ,सचिन गावंडे,अर्जुन गिरी यांनी जाणता राजा शिवाजी महाराज यांनी हिंदवी स्वराज्य प्राती करिता केलेल्या पराक्रमाची माहिती भाषणातून दिली.

Leave A Reply

Your email address will not be published.