Take a fresh look at your lifestyle.

जि.प.शाळा कठोरा येथे जागतिक महिला दिन साजरा

0

शेगांव :
महिलांनी स्वतःच्या हक्कासाठी दिलेल्या लढ्याच्या स्मरणार्थ दरवर्षी ८ मार्च हा दिवस जागतिक महिला दिन म्हणून साजरा करण्यात येतो.
सदर दिनाचे औचित्य साधून आरोग्य विभागातील महिला वैद्यकीय अधिकारी व महिला कर्मचारी शालेय विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणीच्या प्रसंगी दि.८ मार्च रोजी जिल्हा परिषद केंद्रीय उच्च प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक सुनिल घावट व शाळेतील शिक्षक सुरेश डोसे,संजय महाले,पुरूषोत्तम सपकाळ,सचिन वडाळ,सचिन गावंडे,अर्जुन गिरी आदी शिक्षकांनी शुभेच्छा देऊन सन्मान केला.
कोरोना संसर्ग परिस्थिती असो अथवा आरोग्य विषयक अन्य कर्तव्ये अहोरात्र सातत्याने आरोग्य विभागातील महिला कर्मचारी बजावत असतात अश्या कर्तृत्ववान महिला कर्मचा-यांचे सबलीकरण आणि सक्षमीकरण या हेतुने शालेय पोषण आहार कर्मचारी कविता गवळी यांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला.
याप्रसंगी शालेय विद्यार्थी बहुसंख्येने उपस्थित होते.

आरोग्य विभागातील महिला कर्मचारी यांचा सन्मान करतांना शिक्षकवृंद

Leave A Reply

Your email address will not be published.