प्रजासत्ताक दिन जिल्हा परिषद शाळा कठोरा येथे उत्साहात साजरा
शाळा व्यवस्थापन समितीच्या उपाध्यक्षा शारदाताई वावरे यांच्याहस्ते ध्वजारोहण
शेगांव :
पंचायत समिती शेगांव अंतर्गत असलेल्या जिल्हा परिषद मराठी उच्च प्राथमिक शाळा कठोरा येथे कोरोना संसर्ग प्रतिबंधक नियमावलीचे पालन करून प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा करण्यात आला.शाळा व्यवस्थापन समितीच्या उपाध्यक्षा शारदाताई वावरे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.भारतीय राज्यघटनेची प्रास्ताविका,उद्देशिका याचे सामुहिक वाचन करण्यात आले,याप्रसंगी गावच्या प्रथम नागरिक सरपंच सुषमाताई खवले व ग्रामपंचायतचे सर्व पदाधिकारी तसेच शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष सुनिल खवले व सर्व शाळा व्यवस्थापन समितीचै पदाधिकारी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शाळेचे विषय शिक्षक पुरूषोत्तम सपकाळ यांनी तर प्रास्ताविक शाळेचे उच्चश्रेणी मुख्याध्यापक सुनिल घावट यांनी केले.
याप्रसंगी शाळेचे सहायक अध्यापक सुरेश डोसे,पुरूषोत्तम सपकाळ,संजय महाले,सचिन वडाळ,सचिन गावंडे,अंगणवाडी कर्मचारी,पोलीस पाटील व गावातील प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते.