गटसाधन केंद्र शेगांव येथे संत रोहिदास जयंती उत्साहात साजरी
शेगांव :
सरकारी,निमसरकारी कार्यालयांसह शाळेमध्ये संत रोहिदास यांची जयंती तिथीनुसार साजरी करण्यात यावी, असे परिपत्रक महाराष्ट्र शासनाने निर्गमित केले आहे, त्यानुसार गटसाधन केंद्रामध्ये गटशिक्षणाधिकारी नंदकिशोर खरात यांच्या हस्ते संत रोहिदास महाराज यांच्या प्रतिमेचे पुजन करून संत रोहिदास महाराज जयंती उत्साहात साजरी करण्यात आली.
संत रोहिदास हे मध्ययुगीन भारतातील महान संत होते,त्यांनी भारतभर फिरून महान कार्य केल्यामुळे ते जाणले जातात ते सुधारक संतांमध्ये अग्रणी होते.त्यांनी जाती आणि लिंग यांच्यमधील सामाजिक भेदभाव हटविण्यास आणि वैयक्तिक आध्यात्मिक स्वातंत्र्य मिळवण्याच्या प्रयत्नात एकतेला प्रोत्साहन दिले.मन शुद्ध असेल तर कुठेही समाधान लाभते, पाण्याने मनाचे कितीदाही अन कोणत्याही नदीत स्नान केले तरी समाधान लाभत नाही, असा विचारच संत रविदासांचा होता. ‘मन चंगा तो कठौती मे गंगा’ ही हींदी म्हणही संत रोहिदासांच्या वाणीतूनच आली आहे.अशी त्यांच्या कार्याची विस्तृत माहिती प्रास्ताविक भाषणामध्ये गटशिक्षणाधिकारी नंदकिशोर खरात यांनी मनोगतातून व्यक्त केली.
या प्रसंगी गटसाधन केंद्राचे विषय शिक्षक रमेश वानखडे,योगेश गणोरकार,ज्ञानेश्वर घुले,विक्रम फुसे,विनोद वैतकार,राहूल ससाने,जयेश गायकवाड,अमोल पिंगळे,श्रीकांत सोनोने,वंदना लोखंडे,मिरा काळे,प्रहार शिक्षक संघटनेचे तालुकाध्यक्ष सुनिल घावट,सचिन वडाळ,शिक्षक सेनेचे तालुकाध्यक्ष प्रमोद इंगळे आदींची उपस्थिती होती.