Take a fresh look at your lifestyle.

शेगांव येथे श्री संत शिरोमणी सेवालाल महाराज जयंती उत्साहात साजरी

0

शेगांव :
श्री.संत गजानन महाराज आदिवासी आश्रम शाळा येथे दि.१५ फेब्रुवारी रोजी श्री. संत सेवालाल महाराज यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली.या कार्यक्रमाला संत गजानन महाराज आदिवासी आश्रम शाळेचे मुख्याध्यापक आदरणीय उगले यांनी अध्यक्षस्थान भूषविले. तसेच प्रमुख अतिथी म्हणून मोहनसिंग चव्हाण , पी. डी. राठोड , विजय चव्हाण, श्रीकृष्ण राठोड हे व्यासपीठावर उपस्थित होते.

सर्वप्रथम संत शिरोमणी सेवालाल महाराज यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून भोग लावण्यात आला. त्याचबरोबर शेगावीचा राणा संत गजानन महाराज यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आले. तसेच हरित क्रांतीचे प्रणेते वसंतराव नाईक यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आले. या कार्यक्रमाप्रसंगी अनिल पवार व राजेश चव्हाण यांनी सेवालाल महाराजांचे क्रांतिकारी व मानवतावादी विचार मांडले.तसेच डॉ.गणपत राठोड यांच्या सुकन्या यांनी आपल्या सुमधुर आवाजात गीत गायन करून उपस्थितांना मंत्रमुग्ध केले .तद्वतच उगले यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणातून श्री. संत सेवालाल महाराज यांचे पुरोगामी विचार व्यक्त केले .

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री संत गजानन महाराज आदिवासी आश्रम शाळा येथील बावणे यांनी केले तर आभार प्रदर्शन अमरसिंग चव्हाण यांनी केले , या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी श्री संत गजानन महाराज आदिवासी आश्रम शाळा येथील प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक आत्माराम भाबरदोडे आणि त्यांच्या संपूर्ण टीमने विशेष मेहनत घेतली. या कार्यक्रमासाठी वसंतराव नाईक अधिकारी कर्मचारी संघटनेच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी परिश्रम घेतले,तसेच शेगांव शहरातील सर्व गोरबंजारा बंधू आणि भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाची सांगता आदिवासी आश्रम शाळेतील विद्यार्थ्यांना महाप्रसाद देऊन करण्यात आली.

Leave A Reply

Your email address will not be published.