Take a fresh look at your lifestyle.

तीव्र उष्ण तामानामुळे सकाळ पाळीतील शाळेच्या वेळेमध्ये बदल करा

विद्यार्थ्याच्या आरोग्यासाठी प्रहार शिक्षक संघटनेच्या जिल्हा बैठकीत ठराव संमत

0

शेगांव : 
महाराष्ट्र राज्य प्रहार शिक्षक संघटनेची जिल्हा बैठक हाॅटेल आठवण येथे जिल्हाध्यक्ष महेंद्र रोठे यांच्या अध्यक्षतेखाली व जिल्हा सरचिटणीस देवीदास यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये संपन्न झाली,सदर जिल्हा कार्यकारिणीच्या बैठकीमध्ये झालेल्या निर्णयानुसार जिल्ह्यात उष्णतेची लाट आलेली असून तीव्र उन्हामुळे दिवसेंदिवस तापमानात वाढ होत आहे,अति उष्ण तापमानामुळे व तीव्र उष्णतेच्या लाटेची दाहकता लक्षात घेता विद्यार्थ्यांना शाळेत ये-जा करणे सोयीचे व्हावे,दुपारपर्यंत शाळेत थांबल्यामुळे घरी जातांना विद्यार्थ्यांना अति उष्ण तामानामुळे उष्माघाताचा त्रास होऊ शकतो, म्हणून सकाळ पाळीतील शाळेची वेळ कमी करण्यात यावी असे सर्वानुमते सभेमध्ये ठरले.
लगतच्या जिल्हयातील बहुतांश जिल्हा परिषदेच्यावतीने सकाळ पाळीतील शाळेच्या वेळमध्ये सकाळी ७ ते १० असा बदल करण्यात आलेला असून तसे आदेश शाळेनां निर्गमित करण्यात आलेले आहेत.
विद्यार्थ्यांच्या आरोग्याचा सहानुभूतीपूर्वक विचार करून जिल्हयातील शाळेच्या वेळापत्रकामध्ये सकाळी ७ ते १२.३० नमुद करण्यात आलेल्या या वेळे ऐवजी सकाळी ७ ते १० असा विद्यार्थी हितासाठी वेळेमध्ये बदल करण्यात यावा या मागणीचे निवेदन किशोर पागोरे शिक्षणाधिकारी ( प्राथमिक ) यांच्याकडे निवेदनामार्फत मागणी करण्यात आलेली असुन सदर निवेदन सादर करण्यात आले आहे.
याप्रसंगी प्रहार शिक्षक संघटनेचे जिल्हा कार्यकारीणीचे संघटक गजानन दराडे,उपाध्यक्ष धनराज धंदर,सहसंघटक नागरे,संदीप कदम,प्रसिध्दीप्रमुख दिलीप बळी,तालुकाध्यक्ष सुनिल घावट, सचिन वडाळ,श्रीकृष्ण न्याहाटकर,अनिल खेडकर,दिलीप भोपसे,सचिन गावंडे,अर्जुन गिरी,दयालसिंग जाधव,मिलींद इंगळे,सुरेशसिंग पवार आदी पदाधिकारी बहुसंख्येने उपस्थित होते.

जिल्हा कार्यकारीणीच्या बैठकीमध्ये उपस्थित पदाधिकारी

Leave A Reply

Your email address will not be published.