चटोपाध्याय वरिष्ठ वेतन श्रेणीच्या थकबाकीची रक्कम शिक्षकांना अदा करण्यात यावी
गटविकास अधिकारी व गटशिक्षणाधिकारी यांच्याकडे प्रहार शिक्षक संघटनेची मागणी
शेगांव :
बारा वर्ष सेवाकाळ पुर्ण झालेल्या शिक्षकांना चटोपाध्याय वरिष्ठ वेतन श्रेणी लागु करण्यात आलेली असुन सदर चटोपाध्याय वरिष्ठ वेतन श्रेणीच्या थकबाकीची रक्कम मार्च अखेर पर्यंत अदा करण्याची मागणी सहाय्यक गटविकास विकास अधिकारी बी.डब्ल्यू चव्हाण व गटशिक्षणाधिकारी एन.डी खरात यांच्याकडे प्रहार शिक्षक संघटनेचे जिल्हाध्यक्ष महेंद्र रोठे यांच्या मार्गदर्शनाखाली तालुकाध्यक्ष सुनिल घावट व कार्याध्यक्ष सचिन वडाळ यांनी निवेदनामार्फत केली आहे.
याप्रसंगी गटशिक्षणाधिकारी एन.डी.खरात यांनी संघटनेच्या मागणीची दखल घेऊन मार्च अखेर पर्यंत शिक्षकांना थकबाकी रक्कम अदा करण्याची कार्यवाही पुर्ण करण्यासाठी संबंधित शिक्षकांची सेवापुस्तके पडताळणीकरिता तात्काळ लेखा विभागाकडे पाठविण्यात आली असल्याची माहिती चर्चेअंती दिली.
याप्रसंगी कक्ष अधिक्षक अमोल सोळंके गटसाधन केंद्राचे कर्मचारी विनोद वैतकार, श्रीकांत सोनोने,जयेश गायकवाड, राहूल ससाने,विजय डाबेराव, अमोल पिंगळे आदींची उपस्थिती होती.
गटशिक्षणाधिकारी यांच्याकडे निवेदनामार्फत मागणी करतांना प्रहार शिक्षक संघटनेचे पदाधिकारी