कठोरा येथे रामायण महाकाव्य रचयिता आद्यकवी महर्षी वाल्मिकी यांची जयंती उत्साहात साजरी
शेगांव :
पंचायत समिती अंतर्गत असलेल्या जिल्हा परिषद केंद्रीय मराठी उच्च प्राथमिक शाळा कठोरा येथे महर्षी वाल्मिकी जयंती कार्यक्रमाला उपस्थित असलेल्या मान्यवरांसह शालेय विद्यार्थ्यांनी आद्यकवी महर्षी वाल्मिकी यांच्या प्रतिमेचे पुजन केले व नतमस्तक होऊन महर्षी वाल्मिकी यांच्या प्रतिमेला अभिवादन करण्यात आले,यानिमित्ताने शाळेमध्ये विविध कार्यक्रम आयोजित करून उत्साहात जयंती साजरी करण्यात आली.
हजारो वर्षे लोटली असली तरी रामायण या महाकाव्याचा, यातील प्रसंगांचा, तत्त्वांचा प्रभाव अद्यापही ओसरलेला दिसत नाही. याउलट दिवसेंदिवस त्याविषयीची गोडी वाढत असल्याचे दिसून येत आहे असे प्रास्ताविक भाषणातून महर्षी वाल्मिकी यांच्या महाकाव्य रामायण विषयक माहीती शाळेचे मुख्याध्यापक सुनिल घावट यांनी मनोगतातून सांगितली,शालेय विद्यार्थ्यानी महर्षी वाल्मिकी यांच्या कार्याबद्दल माहितीपर भाषणे तसेच प्रश्न मंजुषाद्वारे माहीती दिली.

याप्रसंगी शाळेतील शिक्षिक संजय महाले,अर्जुन गिरी, स्वस्त धान्य दुकानदार बाबुराव खवले व शाळेतील विद्यार्थी उपस्थित होते.