Take a fresh look at your lifestyle.

सेवानिवृत्त एसटी कर्मचारी टेकाळे यांचा नागरी सत्कार

0

उध्दव नागरे
लोणार :-
सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचा आपल्या विभागाकडून सत्कार होणे यात काहि नविन राहिले नाहि. परंतु एस.टि.मध्ये संपूर्ण आयुष्यभर जनतेचि सेवा करणाऱ्या राज्य परिवहन महामंडळ बुलढाणा विभाग मेहकर आगारमध्ये वाहक या पदावरून पदोन्नति घेऊन वाहतूक नियंत्रक या पदावर चांगली नोकरी करून जनतेचि सेवा करून सेवानिवृत्त झाल्याबद्दल लोणार तालुक्यातील वडगाव तेजन येथिल श्री मनोहर टेकाळे यांचा आज वडगाव तेजन येथील नागरिक तसेच गावातील एस.टी.कर्मचारि व कै.परमेश्वर उत्तमराव तेजनकर पाटील बहुद्देशीय संस्था वडगाव तेजन तर्फे शाल श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.
यावेळि कै.परमेश्वर उत्तमराव तेजनकर पाटील बहुउद्देशीय संस्थेचे सचिव तथा पत्रकार सतीश पाटील तेजनकर व संस्थेचे पदाधिकारी,उपसरपंच सुरेश जाधव, सेवानिवृत्त वाहतूक नियंत्रक एम.डि. खरात,शरद पाटिल तेजनकर,चालक तेजराव संपतराव तेजनकर,वाहक जि.के.कांबळे ग्रा.शिपाई गजानन शिरसाट,कुकाजि चेके सह गावातिल बरेच नागरिक हजर होते.

Leave A Reply

Your email address will not be published.