Take a fresh look at your lifestyle.

राज्य सरकारची मोठी घोषणा, १५ फेब्रुवारीपर्यंत राज्यातील महाविद्यालयं बंद राहणार; परीक्षांबद्दलही घेतला निर्णय!

राज्यातील वाढत्या करोना रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने मोठा निर्णय घेतला आहे.

0

राज्यात करोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर महाविद्यालये आणि परीक्षांच्या बाबतीत मोठा निर्णय राज्य सरकार घेणार असल्याची चर्चा गेल्या दोन दिवसांपासून सुरू होती. आज राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी यासंदर्भात घोषणा केली असून राज्यातील सर्व अकृषी महाविद्यालये आणि तंत्रशिक्षण संस्था १५ फेब्रुवारीपर्यंत बंद राहणार असल्याचं त्यांनी जाहीर केलं आहे. तसेच, सर्व विद्यापीठांनी ऑनलाईन पद्धतीने परीक्षा घेण्याचा निर्णय देखील घेण्यात आल्याचं त्यांनी सांगितलं.

परीक्षा ऑनलाईनच होणार!

मंगळवारी यासंदर्भात सविस्त बैठक झाल्यानंतर आज उदय सामंत यांनी यासंदर्भातला निर्णय जाहीर केला आहे. “सर्व अकृषी विद्यापीठे, अभिमत विद्यापीठे, तंत्रनिकेतन, विद्यापीठांशी संलग्नित महाविद्यालयांमधली परीक्षा ऑनलाईन पद्धतीने घेतली जाणार असल्याचा निर्णय घेण्यात आला आहे. विजेची अनुपलब्धता, नेटवर्क कनेक्टिव्हिटीमुळे, विद्यार्थ्यांच्या कुटुंबात किंवा विद्यार्थी करोनाबाधित असतील तर त्यांचं शैक्षणिक वर्ष वाया जाऊ नये, याची दक्षता सर्व विद्यापीठांनी घेतली पाहिजे. खासगी विद्यापीठांनी देखील याच निर्णयाचं पालन करायला हवं”, असं ते म्हणाले.

वसतीगृह देखील बंद करण्याचे निर्देश

“सर्व विद्यापीठं, महाविद्यालयांशी निगडीक वसतीगृहात राहणाऱ्या विद्यार्थ्यांना पूर्वसूचना देऊन आणि निश्चित कालावधी देऊन वसतीगृह देखील बंद करण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला आहे. त्याची अंमलबजावणी सर्व विद्यापीठांनी करावी. पण जे विद्यार्थी परदेशातून आपल्या राज्यात आले आहेत, त्यांची वसतीगृहाची सुविधा मात्र बंद करण्यात येऊ नये”, असं उदय सामंत म्हणाले.


[cardoza_facebook_like_box]

वार्ताहर नेमणे आहेत

मराठी बातम्या मिळवा आता टेलीग्रामवर.. आमचं चॅनेल (@Batmyaa) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Leave A Reply

Your email address will not be published.