Take a fresh look at your lifestyle.

IND vs PAK : पाकिस्तानवर भारताचा विजय; महिला क्रिकेट संघाने फोडला विजयाचा नारळ

भारताकडून स्मृती मानधनाने (Smriti Mandhana) 42 चेंडूत नाबाद 63 धावांची आक्रमक खेळी केली.

0

Commonwealth Games INDW vs PAKW Live : राष्ट्रकुल स्पर्धेत भारताने पाकिस्तानचा आठ विकेट्सनी पराभव करत आपला पहिला विजय साजरा केला. भारताने पाकिस्तानचे 100 धावांचे माफक आव्हान 12 व्या षटकात दोन फलंदाजांच्या मोबदल्यात पार केले. भारताकडून स्मृती मानधनाने (Smriti Mandhana) 42 चेंडूत नाबाद 63 धावांची आक्रमक खेळी केली. तर गोलंदाजीत स्नेह राणा आणि राधा यादव यांनी प्रत्येकी 2 विकेट घेतल्या.

पाकिस्तान महिला क्रिकेट संघाने भारतसमोर विजयसाठी 100 धावांचे आव्हान ठवले. हे आव्हान पार करताना स्मृती मानधना आणि शेफाली वर्मा यांनी 61 धावांची सलामी दिली. यात स्मृती मानधनाचा 44 धावांचा तर शेफाली वर्माचा 16 धावांचे योगदान होते. स्मृती मानधनाने षटकार खेचत आपले अर्धशतक दणक्यात साजरे केले.

दरम्यान, शेफाली बाद झाल्यानंतर आलेल्या एस मेघनाने स्मृतीला चांगली साथ देत भारताला 10 षटकात 92 धावांपर्यंत पोहचवले. मात्र विजयासाठी 6 धावांची गरज असताना तिला ओमैमा सोहैलने 14 धावांवर बाद केले. अखेर स्मृती आणि जेमिमाहने 12 व्या षटकात भारताला विजय मिळवून दिला. स्मृतीने 42 चेंडूत नाबाद 63 धावा केल्या.

राष्ट्रकुल स्पर्धेत आज भारतीय महिला क्रिकेट संघ (India Women’s Cricket Team) आणि पाकिस्तान महिला क्रिकेट संघ यांच्यातील सामन्यात पाकिस्तानने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. मात्र मेघना सिंहने इराम जावेदला शुन्यावर बाद करत पहिला धक्का दिला.

मात्र त्यानंतर पाकिस्तानची कर्णधार बिसमाह मारूफ आणि मुनीबा अली यांनी दुसऱ्या विकेटसाठी अर्धशतकी भागीदारी रचत डाव सावरला. मात्र स्नेह राणाने 8 व्या षटकात बिसमाह मारूफ (17) आणि मुनीबा मारूफला (32) पाठोपाठ बाद करत पाकिस्तानला दोन मोठे धक्के दिले.

यानंतर आलेल्या पाकिस्तानच्या (Pakistan Women’s Cricket Team) इतर फलंदजांना फारशी चमक दाखवता आली नाही. सोहैल आणि नसीम या दोघींनी प्रत्येकी 10 धावांची भर घालत पॅव्हेलियनमध्ये परतल्या. तर आलिया रियाझ 18 धावांवर धावबाद झाली. त्यानंतर याच सामन्याच्या 17 व्या षटकात सहाव्या चेंडूवर कैनात इम्तियाज देखील भोपळाही न फोडता माघारी गेली.

शेवटच्या षटकात राधा यादवने दियाना बैगला शुन्यावर स्टम्पिंग करत पाकिस्तानला आठवा धक्का दिला. त्यानंतर तुबा हसन देखील 1 धाव करून धावबाद झाली. डावाच्या शेवटच्या चेंडूवर राधा यादवने कैनतचा त्रिफळा उडवत पाकिस्तानला 99 धावांवर गुंडाळले. भारताकडून स्नेह राणा, राधा यादवने प्रत्येकी 2 विकेट घेतल्या. पाकिस्तानकडून मुनीबा अलीने सर्वाधिक 30 चेंडूत 32 धावा केल्या.

Leave A Reply

Your email address will not be published.