Take a fresh look at your lifestyle.

शिक्षकांसाठी वरिष्ठ व निवड वेतनश्रेणीचे प्रशिक्षण आयोजित करा

प्रहार शिक्षक संघटनेची शिक्षणाधिकारी यांच्याकडे मागणी

0

शेगांव :
सर्व शिक्षा अभियान,राष्ट्रीय माध्यमिक शिक्षा अभियान अंतर्गत विद्या प्राधिकरणाच्यावतीने शिक्षकांसाठी वरिष्ठ व निवड वेतनश्रेणी लागू करण्यासाठी सदर वेतनश्रेणीचे प्रशिक्षण राबविण्याचा निर्णय शालेय शिक्षण विभागाने घेतला आहे.

या प्रशिक्षणामुळे शिक्षकांना त्यांच्या सेवा काळामध्ये व विद्यार्थ्यांच्या गुणवत्ता वाढीसाठी लाभ होणार असुन वरिष्ठ व निवड वेतनश्रेणी लागू करण्यासाठी शिक्षकांना सदर प्रशिक्षण पुर्ण केल्याचे प्रमाणपत्र आवश्यक आहे त्यामुळे जिल्हयातील प्राथमिक व माध्यमिक शाळेतील १२ वर्ष व २४ वर्ष सेवाकाळ पुर्ण झालेल्या शिक्षकांचे ऑनलाईन अथवा ऑफलाईन प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात यावे अशी मागणी प्रहार शिक्षक संघटनेचे जिल्हाध्यक्ष महेंद्र रोठे यांच्या मार्गदर्शनाखाली तालुकाध्यक्ष सुनिल घावट यांनी शिक्षणाधिकारी ( प्राथमिक )किशोर पागोरे,जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य विजयकुमार शिंदे,गटशिक्षणाधिकारी एन.डी.खरात यांच्याकडे निवेदनामार्फत मागणी केली आहे.

याप्रसंगी प्रहार शिक्षक संघटनेचे कार्याध्यक्ष सचिन वडाळ,केंद्रसमन्वयक सचिन गावंडे,सदस्य अर्जुन गिरी आदी पदाधिकारी बहुसंख्येने उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.