Take a fresh look at your lifestyle.

प्रहार शिक्षक संघटनेच्या मागणीनुसार शिक्षकांच्या वेतनश्रेणीच्या सेवांतर्गत प्रशिक्षणाचे आयोजन

जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य विजयकुमार शिंदे यांच्याशी चर्चा

0

बुलडाणा : 
चार महिन्यांपूर्वी दोन हजार रुपये शुल्क भरूनही जिल्हयातील शिक्षकांना सेवांतर्गत प्रशिक्षण देण्याच्या प्रक्रिया अद्यापपर्यंत सुरू करण्यात आलेली नव्हती.सदर प्रशिक्षणाअभावी शिक्षकांना वरिष्ठ व निवड श्रेणीपासून वंचित राहत असल्यामुळे शिक्षकांमध्ये नाराजी व्यक्त केली जात होती या विषयाची प्रहार शिक्षक संघटनेचे जिल्हाध्यक्ष महेंद्र रोठे यांनी दखल घेऊन शिक्षकांना १२ वर्षांनंतर वरिष्ठ वेतन श्रेणी आणि २४ वर्षांनंतर निवड श्रेणीचे सेवांतर्गत प्रशिक्षण लवकरात लवकर आयोजित करण्याची मागणी जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य विजयकुमार शिंदे यांच्याशी चर्चा करून शिक्षण संचालक एस.सी.ई.आर.टी. पुणे यांच्याकडे निवेदनामार्फत केली व उपसंचालक गरड यांच्याशी भ्रमणध्वनीवरून चर्चा करण्यात आली,सदर मागणीची दखल घेऊन लवकरात लवकर सदर प्रशिक्षणाचे आयोजन करण्याचे त्यांनी याप्रसंगी आश्वासन दिले होते त्यानुसार १५ मे ते १४ जुन या कालावधीमध्ये प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आलेले असुन सदर प्रशिक्षणाची लिंक एस.सी.ई.आर.टी.पुणे यांच्यावतीने https://youtu.be/Yg2L_U25jM लिंक उपलब्ध करून देण्यात आलेली असुन सदर प्रशिक्षणाची लिंक भरल्यानंतर सदर शिक्षकाच्या मोबाईलवर लाॅगीन आय.डी. व पासवर्ड पाठवण्याची व्यवस्था एस.सी.ई.आर.टी करणार आहे.सदर प्रशिक्षणाची लिंक भरण्याचे आवाहन प्रहार शिक्षक संघटनेच्यावतीने शिक्षकांना करण्यात आले आहे.
याप्रसंगी जिल्हा पदाधिकारी सरचिटणीस देवीदास,कार्याध्यक्ष गणेश नरोटे,संघटक गजानन दराडे,उपाध्यक्ष धनराज धंदर,अविनाश घुगे,मुरलीधर टाकरस,प्रसिद्धीप्रमुख दिलीप बळी,सहसचिव संदिप नागरे,सहसंघटक शकिल पीर मोहम्मद,संदिप कदम, जिल्हा प्रतिनिधी अन्सार शहा,शेख बिसमिल्ला शेख नुरा,शेगांव तालुकाध्यक्ष सुनिल घावट आदी प्रहार शिक्षक संघटनेचे तालुका व जिल्हा पदाधिकारी बहुसंख्येने उपस्थित होते.

प्राचार्य विजयकुमार शिंदे यांना प्रशिक्षण आयोजित करण्याच्या मागणीचे निवेदन देतांना प्रहार शिक्षक संघटनेचे जिल्हा पदाधिकारी

Leave A Reply

Your email address will not be published.