Take a fresh look at your lifestyle.

BJP : अशोक चव्हाणांसह विश्वजीत कदम भाजपमध्ये जाणार? प्रवेशावर काँग्रेस नेत्याचं स्पष्टीकरण

0

सांगली : काँग्रेसचे नेते आणि माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण (Ashok Chavan) आता भाजपच्या (BJP) वाटेवर असल्याची चर्चा रंगलीय. अशोक चव्हाण यांच्यासोबत काँग्रेसचे (Congress) काही आमदार सुद्धा भाजपच्या गळाला लागले आहेत. जर अशोक चव्हाण भाजपमध्ये आले तर 15 आमदार घेऊन यावे, अशी अट भाजपकडून ठेवण्यात आल्याची चर्चा असतानाच काँग्रेस नेते विश्वजीत कदम (Vishwajeet Kadam) यांनी भाजप प्रवेशावर स्पष्ट शब्दांत प्रतिक्रिया दिलीय.

महाराष्ट्रामध्ये सत्तानाट्य होऊन एक महिना होत नाही तोच आता काँग्रेस नेते आणि माजी मंत्री अशोक चव्हाण, विश्वजीत कदम पक्ष सोडून भाजपमध्ये जाणार असल्याची चर्चा जोर धरू लागलीय. दोनच दिवसांपूर्वी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) आणि अशोक चव्हाण यांची एका ठिकाणी भेट झाली. त्यामुळं राजकीय चर्चांना आणखी बळ मिळालं. या पार्श्वभूमीवर विश्वजीत कदम यांनी भाजप प्रवेशाबाबत सुरू असलेल्या चर्चांवर भाष्य केलंय.

‘त्यावर आता मी बोलू इच्छित नाही’

‘काँग्रेस पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी पक्षातील कोणीही भाजपमध्ये जाणार नसल्याचं स्पष्ट केलं आहे. त्यामुळं मी पुन्हा यावर वक्तव्य करणं अपेक्षित नाही,’ असं विश्वजीत कदम यांनी म्हटलंय. ‘आमचे विधिमंडळ पक्षाचे नेते आणि माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी काँग्रेस नेत्यांच्या भाजप प्रवेशाबाबतच्या चर्चांवर स्पष्टीकरण दिलंय. माजी मंत्री अशोक चव्हाण असतील किंवा इतर नेते असतील त्यांच्या बाबतीत माध्यमात येणाऱ्या बातम्यांबाबत थोरात यांनी वक्तव्य केलं आहे, त्यामुळं त्यावर आता मी बोलू इच्छित नाही,’ असंही कदम यांनी म्हटलंय. विश्वजीत कदम यांनी भाजपमध्ये प्रवेश करणार नाही, असं थेट सांगणं टाळल्यानं पुन्हा तर्क-वितर्क लढवले जात आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.