Take a fresh look at your lifestyle.

टाकळी विरो येथे कोरोना प्रतिबंधक लसीकरण शिबिर संपन्न

टाकळी विरो येथे कोरोना प्रतिबंधक लसीकरण शिबिर संपन्न

0

शेगांव :
प्राथमिक आरोग्य केंद्र भोनगाव अंतर्गत टाकळी विरो येथे वैद्यकीय अधिकारी डॉ.अनिल बनकर यांच्या मार्गदर्शनाखाली गावातील नागरिकांचे कोरोना संसर्ग प्रतिबंधक लसीचे लसीकरण करण्यात आले आहे.
बारा वर्षावरील लाभार्थ्यांना व गावातील प्रोढ नागरिकांना कोरोना प्रतिबंधक लसीचा पहिला डोस,दुसरा डोस व बुस्टर डोस देण्यात आलेले असुन कोव्हिशिल्डचे ४२, कोहॅक्सिन १०, कोर्बेव्हॅक्स ९ असे एकूण ६१ लाभार्थ्यांना कोरोना प्रतिबंधक लसीचे लसीकरण करण्यात आले आहे.
याप्रसंगी डाॅ.तृप्ती लखोटिया,आरोग्य सहाय्यक आर.पी.निखाडे,उषा मुंडे,एस.बी.सरोदे,आशा वर्कर इंगळे,काळे,चंदाबाई तायडे आदींनी अथक परिश्रम घेतले.

Leave A Reply

Your email address will not be published.