Take a fresh look at your lifestyle.

कठोरा येथील ६० गावक-यांनी घेतली कोरोना प्रतिबंधक लस

गावक-यांना लसीकरणाचे महत्त्व पटवून शिक्षकांनी केले सहकार्य

0

शेगांव :
प्राथमिक आरोग्य केंद्र भोनगाव अंतर्गत मौजे कठोरा येथे डाॅ.ललित राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली दि.१६ सप्टेंबर रोजी कोरोना प्रतिबंधक कोव्हिशिल्ड या लसीचे लसीकरण शिबिर संपन्न झाले.

या शिबिरामध्ये आरोग्य सेविका अंजली सोनार यांनी ६० ग्रामस्थांचे यशस्वीपणे लसीकरण केले.याप्रसंगी शाळेतील शिक्षकांनी कोरोना संसर्ग टाळण्यासाठी लसीकरणाचे महत्त्व ग्रामस्थांना पटवून सहभाग नोंदविला.

कोरोना संसर्ग लसीकरणाची ऑनलाईन नोंदणी करतांना डाॅ.ललित राठोड व उपस्थित कर्मचारी

या शिबिरामध्ये ग्रामपंचायतचे डाटा ऑपरेटर देठे,आशावर्कर लताताई कठोरकार, शाळेचे उच्चश्रेणी मुख्याध्यापक सुनिल घावट,पुरूषोत्तम सपकाळ,सचिन वडाळ,अर्जुन गिरी,संजय महाले,सुरेश डोसे,सचिन गावंडे,शालेय पोषण आहार मदतनीस कविताबाई गवळी यांनी सहभाग नोंदवून कोरोना संसर्ग प्रतिबंधक लसीकरण शिबिर यशस्वीपणे पाडण्यास सहकार्य केले.

 


[cardoza_facebook_like_box]

वार्ताहर नेमणे आहेत

मराठी बातम्या मिळवा आता टेलीग्रामवर.. आमचं चॅनेल (@Batmyaa) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Leave A Reply

Your email address will not be published.