Take a fresh look at your lifestyle.

नागालँडमधील चकमकीत गोंदियाचे जवान प्रमोद कापगते यांना वीरमरण, सेवा निवृत्तीच्या 15 दिवस आधी शहीदत्व

शहीद प्रमोद कापगते हे केंद्रीय राखीव पोलीस दलात कार्यरत होते. नागालॅंड बॉर्डरवर सकाळी झालेल्या चकमकीत गोळी लागून ते शहीद झाले.

0

गोंदिया : नागालँडमध्ये झालेल्या चकमकीत गोंदियाच्या सडक अर्जुनी तालुक्यातील परसोडीचे जवान प्रमोद विनायक कापगते यांना वीरमरण आलं आहे. शहीद प्रमोद कापगते हे केंद्रीय राखीव पोलीस दलात कार्यरत होते. नागालॅंड बॉर्डरवर सकाळी झालेल्या चकमकीत गोळी लागून ते शहीद झाले. प्रमोद कापगते हे भाजपचे ज्येष्ठ नेते विनायक कापगते यांचे सुपुत्र होते. शहीद प्रमोद यांचे पार्थिव त्यांचे मूळ गाव परसोडी गुरुवारी इथं सकाळी 8 वाजता अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे. प्रमोद कापगते शहीद झाल्यानं परसोडी गावावर शोककळा पसरली आहे. (CRPF jawan Pramod Kapgate martyred at Nagaland border)

शहीद प्रमोद कापगते यांचे कुटुंबिय परसोडी इथेच वास्तव्याला आहेत. प्रमोद कापगते हे बीएच्या शेवटच्या वर्षाला असताना 2001 मध्ये केंद्रीय राखव पोलीस दलात भरती झाले होते. त्यांचं प्राथमिक शिक्षण परसोडीमधील जिल्हा परिषद शाळेत झालं तर महाविद्यालयीन शिक्षण त्यांनी तालुक्याच्या ठिकाणी घेतलं होतं. गेल्या 20 वर्षापासून ते केंद्रीय राखीव पोलीस दलात सेवा बजावत होते.

20 वर्षांचा बाँड 15 दिवसांनी पूर्ण होणार होता!

महत्वाची बाब म्हणजे त्यांचा सीआरपीएफमधील 20 वर्षांचा बाँड 15 दिवसांनी पूर्ण होत होता. मात्र मंगळवारी सकाळी नागालँड बॉर्डरवर झालेल्या चकमकीत ते गोळी लागून शहीद झाले. शहीद प्रमोद कापगते यांच्य पश्चात पत्नी वंदना कापगते, मुलगा कुणाल, भाऊ राजेश कापगते आणि मोठा परिवार आहे. शहीद प्रमोद यांचे पार्थीव गुरुवारी सकाळी 8 वाजता परसोडी इथं दाखल होणार आहे. गुरुवारीच त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार होणार आहेत.

 


[cardoza_facebook_like_box]

वार्ताहर नेमणे आहेत

मराठी बातम्या मिळवा आता टेलीग्रामवर.. आमचं चॅनेल (@Batmyaa) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Leave A Reply

Your email address will not be published.