Take a fresh look at your lifestyle.

सख्खे मित्रच निघाले वैरी! तुरुंगातून सुटून आलेल्या मित्रानेच केला खून

'एमपीडीए' अंतर्गत स्थानबद्धतेतून १५ दिवसांपूर्वीच सुटका झालेल्या आरोपीने पैशाच्या देवाण-घेवाणीतून मित्राचा खून केल्याची घटना जालना स्थानिक गुन्हे शाखेने उघडकीस...

0

जालनाः ‘एमपीडीए’ अंतर्गत स्थानबद्धतेतून १५ दिवसांपूर्वीच सुटका झालेल्या आरोपीने पैशाच्या देवाण-घेवाणीतून मित्राचा खून केल्याची घटना जालना स्थानिक गुन्हे शाखेने उघडकीस आणली आहे. भरत मुजमुले या फळविक्रेत्याचा पहाटे खून करून त्याचे प्रेत फेकून देण्यात आले होते. स्थानिक गुन्हे शाखेने वेगाने तपास करत या प्रकरणाचा छडा अवघ्या २४ तासांत लावला असून तीनपैकी दोन आरोपींना ताब्यात घेतले आहे.

भरत अशोक मुजमुले या फळ विक्रेत्याचा खून त्याच्या तीन गुन्हेगार मित्रांनी दारूच्या नशेत पैश्याच्या देवाणघेवानीतून केल्याची बाब तपासात पुढे आली आहे. जालना शहरातील एमपीडीएअंतर्गत एक वर्ष स्थानबद्ध असलेला व काही दिवसांपूर्वी तुरूंगातून सुटून आलेल्या ऋषी भगवान जाधव आणि आकाश लुंगे व आणखी एक अशा तीन जणांनी चाकूने वार करून भरतचा खून केला. आरोपींपैकी ऋषी व आकाश या दोघांना स्थानिक गुन्हे शाखेने ताब्यात घेतलं आहे. पोलिसांनी पकडण्यापूर्वीच ऋषी जाधव याने विषारी औषध प्राशन केल्याने त्याच्यावर जिल्हा सरकारी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

मृतक भरत याच्या भावाच्या तक्रारीवरून कदीम जालना पोलिसात तीन जणांविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक सुभाष भुजंग व त्यांच्या पथकाने अवघ्या काही तासातच आरोपींची शोध लावला आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.