अंजनी खुर्द महसूल मंडळ मध्ये ओला दुष्काळ जाहीर करा – उध्दव नागरे
लोणार प्रतिनिधी
परतीच्या पावसाने खरीप हंगामातील सोयाबीन पिकाचे दिनांक 16 व 17 ऑक्टोबर रोजी ढगफुटी सदृश्य अतिवृष्टी होऊन, शेतामध्ये पाणी पसरल्याने सोयाबीन पिकाचे प्रचंड मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

लोणार तालुक्यातील इतर सहा मंडळे अतिवृष्टी मध्ये बसतात व शेजारील सुलतानपूर महसूल मंडळ सुद्धा अतिवृष्टी मध्ये बसते, त्यात त्याला लागूनच अंजनी खुर्द महसूल मंडळ असून या मंडळ मध्ये सुद्धा अतिवृष्टी झाली आहे, मग शेजारील महसूल मंडळाला एक न्याय व अंजनी खुर्द महसूल मंडळाला दुसरा न्याय या विरोधात आज लोणार तहसीलदार साहेब यांच्यामार्फत माननीय मुख्यमंत्री साहेब यांना निवेदन सादर करण्यात आले आहे,की अंजनी खूप महसूल मंडळ मधील सर्व गावातील शेतकरी बांधवांना दिवाळीपूर्वी शासकीय आर्थिक मदत मिळावी अशी मागणी करण्यात आली, सोबत संतोष घुले, सुदाम चव्हाण, रामेश्वर घुले, अक्षय गायकवाड, रमेश भागडे ,राजू इंगळे व चांद भाई ज्येष्ठ नेते उपस्थित होते.