Take a fresh look at your lifestyle.

सावरगांव ग्राम पंचायत मधे रोजगार हमी योजनेत दिरांगाई व भ्र्ष्टाचार

0

प्रतिनिधी शंकरपूर

चिमूर : 
तालुक्यातील नेरीवरून जवळ असलेल्या सावरगांव ग्राम पंचायतमधे महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेत भ्रष्टाचार व कामात दिरांगाई होत असल्याची तक्रार गावातील नागरिकांनी संवर्ग विकास अधिकारी यांना तक्रार अर्जाद्वारे दिली,
गरीबाच्या भल्यासाठी सुरु करण्यात आलेल्या महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेला स्वताच्या भल्यासाठी राबविन्याकरीता काही मजूराना ऐकाच वेळी वेगवेगळ्या ठिकाणी कामे केल्याचे दाखऊन त्यांची मजूरी काढ़ने, शासनाकडून पैसा वसूल करण्याकरीता बनावट मस्टर तयार करने आणि मंजूर कामावर नसताना मजूरी लावणे, मेजरमेंट नुसार कामे न करने, अश्या विविध प्रकारानी भृष्टाचार करण्यात आला आहे,
सावरगांव ग्राम पंचायत मधे कामाची मोजनी झाली असता हपत्याच्या पेमेंट मधे तफ़ावत झाली आहे, पेमेंट काढ़ताना काही मजूरांचे पेमेंट जास्त तर काही मजूरांचे पैसे कमी काढण्यात आले, बोड़ी खोलिकारणाच्या कामात मश्टर वरील काम अलग व प्रत्यक्षात काम बघितल्यास कामात तफ़ावत दिसून येत आहे, सन 2021-22 मनरेगा अंतर्गत शोषखड्याचे बाँधकाम निकृष्ट दरज्याचे व कामात भ्रष्टाचार झाल्याचे दिसून येत आहे, शोषखड़े तयार करताना वाटेल त्या ठिकाणी शोष खड्डा तयार करने, ड्रम फिट करने व मटेरियल टाकून एक साधा पिवहिसि पाइप जोडून बांधकाम पूर्ण झाल्याचे प्रकार सावरगांव ग्राम पंचायत मधे झाले आहे, 70 ते 75 वर्ष वयोगाटातील लेबर चे नावे टाकून यांचे नावावर लेबर स्वरुपात पैशयाची उचल केली आहे, बोड़ी खोलिकरन व शोष खड्याचे संदर्भात कार्यालयीन चौकसी अंती शासकिय स्तरावरुन संबंधित जिम्मेदार पदाधीकारी, सचिव, रोजगार सेवक व संबंधित यंत्रणा यांचेवर कारवाई करण्यात यावी असी मागणी तक्रार अर्जाद्वारे संवर्ग विकास अधिकारी याना तक्रार अर्जे देण्यात आला,
या वेळी ग्राम पंचायत सदस्य सौ, निषाशा कुमरे, सौ, लता दडमल, तसेच गावातील नागरिक शंकर ताम्बरे, नरेंद्र नवले, विजय मेश्राम, हेमराज झालवाड़े, रामकृष्ण झोड़े, पांडुरंग दडमल, पुष्पा झालवाड़े, वृंदा जीवतोड़े, शालू पडवे, रोशन मुरकुटे, विनोद भरडे, अरुण नाकाडे, श्रीकांत नाकाडे व अन्य नागरिक उपस्थित होते

Leave A Reply

Your email address will not be published.