शिक्षकांच्या प्रलंबित समस्या निकाली काढण्याची प्रहार शिक्षक संघटनेच्यावतीने गटशिक्षणाधिकारी यांच्याकडे निवेदनामार्फत मागणी
शेगांव :
जिल्हास्तरिय व तालुकास्तरिय शिक्षकांच्या विविध वैयक्तिक व सामुहिक प्रशासकीय प्रलंबित समस्या सोडविण्याची मागणी गटशिक्षणाधिकारी एन.डी.खरात यांच्याकडे दि.३ मार्च रोजी प्रहार शिक्षक संघटनेचे तालुकाध्यक्ष सुनिल घावट यांनी निवेदनामार्फत केली आहे.
चट्टोपाध्याय वरिष्ठ वेतन श्रेणीची गत दिड वर्षापासून प्रलंबित असलेली थकबाकीची रक्कम अदा करणे,सलगपणे १२ वर्ष सेवाकाळ पुर्ण झालेल्या शिक्षकांचे चटोपाध्याय वरिष्ठ वेतन श्रेणीचे प्रस्ताव वरिष्ठ कार्यालयाकडे मंजुरीस्तव पाठविणे,२४ वर्ष सेवाकाळ पुर्ण झालेल्या शिक्षकांचे निवड वेतन श्रेणीचे प्रस्ताव संबंधितांकडे मंजुरीस्तव पाठविणे,शिक्षकांची सेवा पुस्तके अद्यावत करण्यासाठी तालुकास्तरिय कॅम्प आयोजित करणे,शिक्षण विस्तार अधिकारी,केंद्र प्रमुख,उच्चश्रेणी मुख्याध्यापक ही रिक्त पदे सेवाज्येष्ठतेनुसार पदोन्नतीने भरणे,अंपग प्रवर्गातील रिक्त असलेला अनुशेष भरून अंपग शिक्षकांना पदोन्नती मिळणे,प्रशासकीय कामाच्या ठिकाणी महिलांच्या होणा-या लैंगिक
छळाच्या तक्रारींची चौकशी करण्यासाठी प्रत्येक
कार्यालयात “विशाखा महिला तक्रार समिती गठीत” करणे,भविष्य निर्वाह निधीची रक्कम अदा करण्यासंदर्भात बीडीएस संगणक प्रणालीमध्ये अनेक तांत्रिक अडचणी उद्भवून रक्कम अदा करण्याकरिता विलंब होत असल्यामुळे पूर्वीप्रमाणेच भविष्य निर्वाह निधी देयकाची रक्कम शिक्षकांना अदा करणे,शिक्षकांची कोरोना संसर्ग आजारपणाची व इतर आजारपणाची वैद्यकीय देयके तात्काळ अदा करणे, सेवाज्येष्ठता यादी अद्यावत करणे, अप्रशिक्षित शिक्षक प्रशिक्षित झाल्यानंतरचे वेतनवाढ,चटोपाध्याय वरिष्ठ वेतनश्रेणीबाबत आदि लाभ मिळणे,तालुक्यातील शाळेवरील अतिरिक्त झालेल्या शिक्षकांचे समुपदेशनाद्वारे इतर शाळेवर समायोजन करणे आदी मागण्या सोडविण्याबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली असता सदर तालुकास्तरिय शिक्षकांच्या प्रलंबित समस्या निकाली काढण्याचे आश्वासन याप्रसंगी गटशिक्षणाधिकारी एन.डी.खरात यांनी दिले.
याप्रसंगी प्रहार शिक्षक संघटनेचे उपाध्यक्ष विनोद डाबेराव,गट साधन केंद्राचे ज्ञानेश्वर घुले,विनोद वैतकार,राहूल ससाने,विक्रम फुसे,जयेश गायकवाड,श्रीकांत सोनोने,अमोल पिंगळे,मिरा काळे,संगीता लोखंडे व आदी प्रहार शिक्षक संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते.
गटशिक्षणाधिकारी एन.डी.खरात यांना
शिक्षकांच्या समस्या सोडविण्याच्या मागणीचे निवेदन देतांना प्रहार शिक्षक संघटनेचे पदाधिकारी