Take a fresh look at your lifestyle.

Corona Updates : देशात कोरोना बाधितांमध्ये 39.1 टक्क्यांनी वाढ, नव्या 12,608 रुग्णांची नोंद

Corona Updates 391 Percent Increase In Covid 19 Patients In India

0

भारतात नवीन COVID-19 रुग्णांमध्ये 39.1% वाढ झाली आहे. गेल्या 24 तासांत 12,608 नवीन रुग्ण आढळले असून 72 जणांचा मृत्यू झाला आहे. सक्रिय रुग्णांची संख्या 101, 343 आहे. गेल्या 24 तासांत 16, 251 लोक कोरोनापासून बरे झाले आहेत. त्याचवेळी, आतापर्यंत एकूण 43,670,315 लोक कोरोनापासून बरे झाले आहेत. आतापर्यंत 527, 206 लोकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. गेल्या 24 तासात 38,64,471 लसीकरण करण्यात आले. आतापर्यंत एकूण 2,08,95,79,722 लसीकरण करण्यात आले आहे.

देशात कोरोनाची संख्या वाढत असल्यामुळे केंद्र सरकारने आता पुन्हा एकदा विमानतळावर व विमानांमध्ये प्रवासी व कर्मचाऱ्यांना मास्क घालणे बंधनकारक केले आहे. याबाबत नागरी हवाई वाहतूक संचालनालयाने आदेश दिले आहेत. मास्क बंधनकारक हा नियम विमानतळावरील सर्व कर्मचारी, प्रवासी यांच्यासाठी लागू असेल. हा नियम पायलट, हवाई सुंदरी, फ्लाईट अटेंडंट यांनाही लागू करण्यात आला आहे.

त्याचबरोबर दिल्ली, पंजाबमध्ये मास्कसक्ती करण्यात आली आहे. वाढत्या रुग्ण संख्येमुळे तेथील राज्य सरकारने हा निर्णय घेतला आहे. तेथील प्रशासनाने कोरोना नियमावली जारी केली आहे. त्यामध्ये मास्क अनिवार्य करण्यात आला आहे.

 

Leave A Reply

Your email address will not be published.