Take a fresh look at your lifestyle.

दिग्पाल बनला बहिर्जी नाईक.. अंगावर काटा आणणारा लूक…

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनावरील आणि स्वराज्यासाठी धारातीर्थी पडलेल्या मावळ्यांची संघर्षगाथा

0

Digpal lanjekar : सध्या ऐतिहासिक चित्रपटांचे वारे जोरात वाहत आहेत. त्यातही छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनावरील आणि स्वराज्यासाठी धारातीर्थी पडलेल्या मावळ्यांची संघर्षगाथा दाखवण्याकडे अनेकांचा कल आहे. लेखक-दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर याने काही वर्षांपूर्वी शिवचरित्रावर आठ चित्रपटांची मालिका अष्टक करणार असल्याची घोषणा केली होती. सध्या त्यातले तीन चित्रपट प्रदर्शित झाले असून चौथे पुष्प लवकरच प्रेक्षक भेटीसाठी सज्ज झाला आहे.

‘फर्जंद’, ‘फत्तेशिकस्त’, ‘पावनखिंड’ नंतर आता लवकरच त्यांचा आणखी एक ऐतिहासिक चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीसाठी सज्ज झाला आहे. ‘शेर शिवराज’ असे या चित्रपटाचे नाव असून या चित्रपटाचा टीझर काही दिवसांपूर्वी प्रदर्शित झाला होता. त्यानंतर ‘येळकोट देवाचा’ हे गाणे देखील प्रदर्शित झाले. या गाण्याला प्रचंड लोकप्रियता मिळत आहे. तर छत्रपती शिवाजी महाराजांनी केलेला अफझलखानाचा खात्मा, त्याचा इतिहास या चित्रपटातून पाहायला मिळेल.

आता या चित्रपटातील विविध भूमिकांचा उलगडा होताना दिसत आहे. बहिर्जी नाईक कोण साकारणार हे नुकतेच समोर आले आहे. हा अभिनेता दुसरा तिसरा कुणी नसून या चित्रपटाचा लेखक-दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर स्वत: ही भूमिका साकारणार आहेत. ही बातमी दिग्पालने स्वत: त्याच्या सोशल मिडीया अकाउंटवरुन जाहीर केली आहे.

बहिर्जी नाईक हे छत्रपती शिवाज महाराजांच्या सैन्यात गुप्तहेर म्हणून काम करत होते. त्यांच्या साहसी वृत्ती आणि बुद्धी चातुर्याचे धडेस आजही दिले जातात. अशा बहिर्जी नाईकांची भूमिका दिग्पाल कशी साकारणार हे पाहणे महत्त्वाचे ठरेल. येत्या 22 एप्रिल रोजी हा चित्रपट सिनेमागृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे. सध्या दिग्पालच्या नव्या लूकवर चाहते प्रचंड खूश झाले आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.