Take a fresh look at your lifestyle.

सरपंचाच्या संकल्पनेतून नागरिकांना कॅन चे वितरण घर टॅक्स वसुलीचा नवा फंडा – शंकरपूर प्रतिनिधी

0

शंकरपुर:  सरपंचाच्या संकल्पनेतून नागरिकांना कॅन चे वितरण घर टॅक्स वसुलीचा नवा फंडा – शंकरपूर प्रतिनिधी
शंकरपुर ग्रामपंचायतीचे युवा सरपंच साईश वारजूकर यांनी आपल्या अभिनव संकल्पनेतून नागरिकांकडून 100% घर टॅक्स वसूल व्हावा व यातून गावाचा विकास व्हावा यासाठी पाण्याची कॅन चे मोफत वितरण करण्यात येत असून नागरिकांनी याचा फायदा घ्यावा असे आव्हान ग्रामपंचायत शंकरपूर तर्फे करण्यात आले आहे
या दहा वर्षापूर्वी ग्रामपंचायतीचे चपराशी हे घरोघरी जाऊन घर टॅक्स वसुली करत होते परंतु आता घर टॅक्स वसुली करता कोणताही चपराशी घरोघरी येत नसल्याने ग्रामपंचायतीची घर टॅक्स वसुली मंदावली होती याचा परिणाम ग्राम विकासावर होत असल्याने बऱ्याच वर्षापासून थकीत असलेली घर टॅक्स वसुली आत्ता होत असल्याचे दिसून येत आहे
मागील काही वर्षापूर्वी ग्रामपंचायत शंकरपुर ने नागरिकांकरिता थंड पाण्याची व्यवस्था दहा रुपये प्रती क्यान प्रमाणे केली परंतु नागरिकांकडे थंड पाणी नेण्यासाठी कॅन ची व्यवस्था नसल्याने या पाण्याचा उपभोग गावातील बरीच जनता घेत नव्हती परंतु आता ग्रामपंचायतीने थंड पाण्याच्या कॅन चे मोफत वितरण केल्यामुळे घरोघरी थंड पाण्याची व्यवस्था होईल असे दिसून येत आहे
त्याकरिता ग्रामपंचायती चे कर्मचारी है दिवसभर ग्रामपंचायत मध्ये येशी च्या थंड हवेत बसून असतात त्यांना घर टॅक्स वसुली करता बरोबरी पाठविण्यात यावे व थंड पाण्याची व्यवस्था नागरिकांच्या सोयीच्या दृष्टीने प्रत्येक वार्डात करण्यात यावी त्यामुळे नागरिकांना पाणी नेण्यात त्रास होणार नाही अशी मागणी शंकरपुर येथील नागरिकांनी केली आहे

Leave A Reply

Your email address will not be published.