कठोरा येथे शालेय विद्यार्थ्यांना जंतनाशक गोळ्याचे वाटप
शेगांव :
कुपोषण आणि रक्तक्षयावर मात करण्यासाठी इयत्ता पहिली ते आठवी मध्ये शिकत असलेल्या ६ ते १४ वयोगटातील शालेय विद्यार्थ्यांना प्राथमिक आरोग्य केंद्र भोनगावच्यावतीने वैद्यकीय अधिकारी डाॅ.ललित राठोड,आरोग्य सेविका अंजली सोनार व एस.आर.भोबंळे यांच्या मार्गदर्शनाखाली शालेय विद्यार्थ्यांना जंतनाशक गोळ्याचे वाटप करण्यात आले आहे.
जंतामुळे मुलांमध्ये कुपोषण आणि रक्तक्षयाचे आजार बळावत आहेत. आजारामुळे मुले शिक्षणापासून वंचित होऊ शकतात, मुलामुलींमधील आजाराचे प्रमाण कमी करण्यासाठी आरोग्य विभागाच्यावतीने जंतनाशक गोळ्याचे वाटप करण्यात आले आहे.
याप्रसंगी शाळेचे उच्चश्रेणी मुख्याध्यापक सुनिल घावट, शिक्षक सुरेश डोसे, संजय महाले,पुरूषोत्तम सपकाळ,सचिन वडाळ,सचिन गावंडे,अर्जुन गिरी आदींची उपस्थिती होती.
जंतनाशक गोळ्याचे वाटप करतांना शाळेतील शिक्षकवृंद