कठोरा येथील जि.प.शाळेत शालेय लेखन साहित्याचे वाटप
शाळा व्यवस्थापन समिती व प्रतिष्ठित नागरिक यांच्या हस्ते शालेय उपयोगी लेखन साहित्यांचे वाटप
शेगांव :
पंचायत समिती अंतर्गत असलेल्या जिल्हा परिषद केंद्रीय मराठी उच्च प्राथमिक शाळेत इयत्ता पहिली ते इयत्ता चौथीच्या लाभार्थी विद्यार्थ्यांना शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष प्रविण गवळी,सदस्य राजुभाऊ इंगळे,प्रतिष्ठित नागरिक अविनाश जाधव, विशाल लोणे,शिक्षक सुरेश डोसे,संजय महाले,सचिन वडाळ,सचिन गावंडे,अर्जुन गिरी,शाळेचे उच्चश्रेणी मुख्याध्यापक सुनिल घावट यांच्या हस्ते लेटरबुक,पेन,पेन्सिल,खोड रबर, शार्पनर,लेखन डब्बे आदी शालेय उपयोगी लेखन साहित्यांचे वाटप करण्यात आले.

याप्रसंगी गावातील प्रतिष्ठित नागरिक व इयत्ता पहिली ते इयत्ता आठवीचे विद्यार्थी उपस्थित होते