ऋणानुबंध जोपासत प्रहार शिक्षक संघटनेचे जिल्हाध्यक्ष महेंद्र रोठे यांच्या चाहत्यांच्या भेटीचा ओघ महिन्याभरापासून सुरूच
जळगांव (जामोद) :
महाराष्ट्र राज्य प्रहार शिक्षक संघटनेचे जिल्हाध्यक्ष महेंद्र रोठे यांची दुचाकी गुरांच्या धडकेमुळे पडल्यामुळे पायाला इजा झाली होती.पायावरच्या शस्त्रक्रियेपुर्वी व शस्त्रक्रियेनंतरही जिल्हयाभरातील त्यांच्या चाहत्यांचा,मित्र परिवाराचा व शिक्षकाचा भेटीचा ओघ एक महिन्यापासुन सुरूच आहे.

एकीकडे सुखचैनीच्या व पैश्याच्या हव्यासापोटी रक्ताची नाते दुरावत असल्याचे दिसुन येत आहे पण मैत्री असे एक नाते आहे कि रक्ताच्या नात्यापेक्षाही अधिक घट्ट नाते बनवू शकते.मैत्री हे एक असे अनमोल नाते आहे. प्रेमापेक्षा मैत्री महत्त्वाची असते, कारण प्रेम तर सगळ्यांना एकदा तरी रडवते आणि मैत्री ही दुःखातही हसवते,मैत्रीचा एक प्रकार आहे की तो मित्र हा आपला जवळचा आणि आपल्या समस्या जाणून घेणारा असायला पाहिजे,मित्र आपली मनस्थिती नसताना सुद्धा त्याने आपल्याना हसवण्याचा प्रयत्न करायला पाहिजे, महाभारतातील दुर्योधन आणि कर्ण यांची मैत्री अशी होती की कर्णाने मैत्रीसाठी स्वतःच्या भावंडांशी सुद्दा युद्ध केले आहे ,सुवर्ण नगरी असलेल्या श्रीकृष्णाची दारिद्रय परिस्थिती असलेल्या सुदामाशी जिवापाड,जिवाभावाची असलेली श्रीकृष्ण सुदामाची मैत्री नावाजलेली आहे,असे पौराणिक कथेमध्ये अनेक मैत्रीचे उदाहरणे आहेत.

ज्याच्या जवळ मनातील भावना व्यक्त करताना संकोच वाटत नाही,पाप पुण्य सांगण्यात व कबुली देण्यास कचरत नाही,ज्याला आपले पराक्रम आनंदाने सांगावेसे वाटतात असे मैत्रीचे ऋणानुबंध असतात.
प्रहार शिक्षक संघटनेचे जिल्हाध्यक्ष महेंद्र रोठे हे अश्याच प्रकारच्या मैत्रीचे ऋणानुबंध जोपासत असल्यामुळे लोणार,बुलडाणा आणि संपूर्ण जिल्हयाभरातूनच सद्भभावना व जिव्हाळा जोपासत भेटी देणा-या त्यांच्या चाहत्यांचा ओघ दिसून येत आहे.