जिल्हा शिक्षक गौरव पुरस्कार प्राप्त मुख्याध्यापक प्रमोद इंगळे यांचा प्रहार शिक्षक संघटनेच्यावतीने सत्कार
शेगांव :
पंचायत समिती अंतर्गत असलेल्या जिल्हा परिषद मराठी प्राथमिक शाळा चिंचखेड येथे कार्यरत असलेले प्रभारी मुख्याध्यापक प्रमोद इंगळे यांनी तालुक्यातील चिंचखेड येथील आय. एस. ओ. गुणवत्ता प्राप्त शाळा करून,विद्यार्थ्यांसाठी विविध शैक्षणिक व सामाजिक नवोपक्रम शाळेमध्ये उत्कृष्टपणे राबविलेले आहेत असे उपक्रमशील मुख्याध्यापक प्रमोद इंगळे यांच्या या उल्लेखनीय शैक्षणिक कार्याची दखल घेऊन जिल्हा परिषद बुलडाणा यांच्यावतीने देण्यात येणारा जिल्हा शिक्षक गौरव पुरस्कार त्यांना नुकताच घोषित करण्यात आलेला आहे.

उल्लेखनीय कार्याचा गौरव व सन्मान व्हावा,कौतुक व्हावे व पुढील वाटचालीस शिक्षकांना प्रेरणा मिळावी या उद्देशाने प्रभारी मुख्याध्यापक प्रमोद इंगळे यांचा त्यांच्या निवास त्यांचा सपत्नीक शाल,श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन प्रहार शिक्षक संघटनेचे तालुकाध्यक्ष सुनिल घावट यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला आहे.
याप्रसंगी प्रहार शिक्षक संघटनेचे सचिन गावंडे,अर्जुन गिरी,श्रीकृष्ण न्याहाटकर,सचिन वडाळ आदी पदाधिकारी उपस्थित होते.