Take a fresh look at your lifestyle.

कोविड -१९ लस प्रमाणपत्र आहे अत्यावश्यक, असे करा डाऊनलोड

कोविड -१९ लस प्रमाणपत्र आहे आवश्यक

0

कोरोनाकहरातील टाळेबंदीच्यावेळी लादण्यात आलेले निर्बंध सैल करण्याबरोबरच सरकारने कोरोनानियमांचे काटेकोर पालन करण्याचे आवाहनही लोकांना केले आहे. तसेच लसीकरण झाल्याचा पुरावा म्हणून बरोबर प्रमाणपत्र बाळगण्याचा सल्लाही मायबाप सरकारने दिला आहे. लसीकरण प्रमाणपत्र डाऊनलोड करण्याच्या काही सुविधाही देण्यात आल्या आहेत.

लसीकरणाचे प्रमाणपत्र आपण वेगवेगळ्या माध्यमातून डाउनलोड करू शकता

व्हॉट्सॲपद्वारे डाऊनलोडिंग

 1. सर्वप्रथम मोबाइलमध्ये +९१-९०१३१५१५१५ हा क्रमांक सेव्ह करा.
 2. हा क्रमांक सेव्ह केल्यानंतर तो व्हॉट्सॲपमध्येही दिसेल.
 3. व्हॉट्सॲपवर आलेल्या या क्रमांकावर ‘हाय’ व ‘कोविंड सर्टिफिकेट’ यापैकी संदेश पाठवा.
 4. संदेश पाठविल्यानंतर तुमच्या स्क्रीनवर ८ पर्याय येतील.
 5. लसीकरण प्रमाणपत्रासाठी क्रमांक २ चा पर्याय निवडा.
 6. ३ पर्याय मोबाइल स्क्रीनवर येतील. प्रमाणपत्र डाऊनलोड करण्यासाठी ३ टाइप करा.
 7. तुमच्या मोबाइलवर एक ओटीपी येईल. तो तीन मिनिटांच्या आत एन्टर करून तो व्हॉट्सॲपवरून पाठवा.
 8. ज्या मोबाइलवरून लसीकरणासाठी नोंदणी झाली असेल त्या क्रमांकाच्या व्हॉट्सॲपवर प्रमाणपत्र येईल, ते डाऊनलोड करा.

कोविन पोर्टलद्वारे (CO-WIN)

 

 • कोविन पोर्टल किंवा ॲपवरुनही प्रमाणपत्र डाऊनलोड करता येऊ शकते
 • या लिंकवर जाऊन नोंदणीकृत मोबाइल नंबर टाका.
 • मोबाइलवर एक ओटीपी येईल. तो टाकल्यावर लॉग-इन करा.
 • कोविन पोर्टल उघडल्यावर लसीकरण प्रमाणपत्राचा पर्याय येईल, त्यावर क्लिक करून प्रमाणपत्र डाऊनलोड करा.
 • गुगल प्ले स्टोअरवरुन कोविन ॲप डाऊनलोड करता येते.

आरोग्य सेतू ॲपद्वारे

 • आरोग्य सेतू ॲपवरून लसीकरणाच्या दुसऱ्या डोसचेच प्रमाणपत्रच डाऊनलोड करता येऊ शकते.
 • ॲपवर लॉग-इन केल्यानंतर कोविन सेक्शनवर क्लिक करा.
 • या ठिकाणी लसीकरण प्रमाणपत्राचा पर्याय दिसेल.
 • त्यानंतर तुम्हाला १३ आकडी रेफरन्स आयडी एन्टर करावा लागेल.
 • हा रेफरन्स आयडी पहिल्या डोसनंतर मिळालेल्या प्रमाणपत्रावर असतो.
 • हा आयडी एन्टर केल्यानंतर अंतिम प्रमाणपत्र डाऊनलोड करता येईल.

उमंग ॲपद्वारे

 • प्ले स्टोअरवरून उमंग ॲप डाऊनलोड करा.
 • ओटीपी किंवा एमपिनद्वारे तुम्ही ॲपवर लॉग-इन करू शकाल.
 • लॉग-इननंतर ॲपवरील ऑल सर्व्हिस या सेक्शनमध्ये जा.
 • या ठिकाणी कोविन ॲप सेवा दिसेल. त्यावर क्लिक केल्यानंतर तुम्ही थेट कोविन ॲपवर जाल, तेथून प्रमाणपत्र डाऊनलोड करून घ्या.

[cardoza_facebook_like_box]

वार्ताहर नेमणे आहेत

मराठी बातम्या मिळवा आता टेलीग्रामवर.. आमचं चॅनेल (@Batmyaa) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Leave A Reply

Your email address will not be published.